आता WhatsApp च्या मदतीने भारतीय नागरिकांना दिल्ली मेट्रोचे तिकीट खरेदी ही सेवा PeLocal Fintech Private Limited च्या भागीदारीत सुरू करण्यात आली आहे. सध्या याची चाचणी सुरू आहे. DMRC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास कुमार यांच्या हस्ते मेट्रो भवन येथील नवीन पायलट प्रोजेक्टचे उदघाटन करण्यात आले. ज्यांना WhatsaPP वरून दिल्ली मेट्रोचे तिकटी कसे खरेदी करायचे हे जाणून घेऊयात.

व्हॉट्सअ‍ॅपमुळे लोकांना मेट्रोचे तिकीट पटकन खरेदी करणे सोपे होणार आहे. तथापि , तिकीट बुक करण्याचा पर्याय हा काही स्टेशनपुरताच मर्यादित आहे. याचे कारण म्हणजे हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. कार्यरत स्टेशनमध्ये नवी दिल्ली, शिवाजी स्टेडियम , दिल्ली एरोसिटी, IGI विमानतळ आणि द्वारका सेक्टर 21 यांचा समावेश आहे. लवकरच या यादीमध्ये आणखी स्थानके जोडली जाण्याची अपेक्षा आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित
Facebook Update video player In vertical full screen That Offers alongside video playback controls
फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या

हेही वाचा : ऐकावे ते नवलचं! महिलेने AI वापरून बनवला नवरा, नाईट टाइम रूटीन बद्दल केला खास खुलासा, म्हणाली…

व्हॉट्सअ‍ॅपवर दिल्ली मेट्रोची तिकिटे कशी खरेदी करावी ?

१. सर्वात पहिल्यांदा DMRC च्या अधिकृत WhatsApp नंबर – 9650855800 वर hi असे मेसेज करणे आवश्यक आहे.

२. त्यानंतर तुम्ही तुमची आवडीची भाषा निवडू शकता. त्यामध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश असे दोन पर्याय मिळतात.

३. आता ” तिकीट खरेदी करा” या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्टेशन निवडण्याचा पर्याय मिळेल. लास्ट जर्नी तिकीट आणि रिट्रीव्ह तिकीट हे पर्याय देखील दिसतील.

४. आता तुम्हाला किती तिकिटे हवी आहे त्या संख्येवर क्लिक करा.

हेही वाचा : Apple WWDC 2023: अ‍ॅपलच्या ‘या’ नव्या प्रॉडक्ट्सची होणार घोषणा? कधी आणि कुठे पाहता येणार इव्हेंट? जाणून घ्या

५. आता सर्व डिटेल्सची पुष्टी झाल्यांनतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल.

६. त्यानंतर पेमेंटसाठी लिंक जनरेट केली जाते. एकदा का तुम्ही मेट्रोच्या तिकिटासाठी पैसे भरलेत की तुम्हाला , व्हॉट्सअ‍ॅपवर QR-आधारित तिकीट मिळेल.

लोकांना QR-आधारित तिकीट मिळेल, जे प्रिंट करण्याची गरज नाही. प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी AFC गेट्सवर उपलब्ध असलेल्या नियुक्त स्कॅनरवर लोक त्यांचा फोन वापरून QR कोड स्कॅन करू शकतात.