आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करणे आता सोपे झाले आहे. जर तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता अथवा जन्मतारीख चुकली असेल तर तुम्ही घरबसल्या अगदी सहज दुरुस्त करू शकता. आधार कार्डधारक युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही योग्य माहिती अपडेट करू शकता. नाव, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख यासारखी वैयक्तिक माहिती आधार कार्डमध्ये अपडेट केली जाऊ शकते. याबाबतची प्रोसेस जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप…

How to update Aadhaar card details online?

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
  • स्टेप १: अधिकृत uidai.gov.in वेबसाइटला भेट द्या आणि Update Aadhaar सेक्शनला भेट द्या.
  • स्टेप २: यानंतर तुम्हाला ‘Update Address in your Aadhaar’ वर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला पत्त्याशिवाय इतर अनेक माहिती अपडेट करण्याचा पर्याय मिळेल.
  • स्टेप ३: आता Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा आणि युजरनेम, पासवर्ड सारखी सर्व आवश्यक माहिती एंटर करा. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुम्हाला Send OTP बटणावर टॅप करावे लागेल.
  • स्टेप ४: तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ६ अंकी OTP प्राप्त केल्यानंतर, तो साइटवर प्रविष्ट करा. यानंतर तुम्ही तुमचा डेमोग्राफिक डेटा अपडेट करू शकाल. तुम्हाला फक्त demographics data पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर नवीन माहिती प्रविष्ट करा आणि Proceed बटणावर क्लिक करून डेटा सबमिट करा.
  • स्टेप ५: शेवटी तुम्हाला आवश्यक संबंधित कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल, जेणेकरून आधार कार्डमध्ये केलेले बदल अपडेट केले जाऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, आधार अपडेटसाठी तुम्हाला वैध पुरावा द्यावा लागेल.

आणखी वाचा : भारतात लॉंच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Itel A23S, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स

Aadhaar card update online: तुम्ही कोणते डिटेल्स बदलू शकता?
अधिकृत साइटनुसार, खाली नमूद केलेला हा डेटा ऑनलाइन अपडेट केला जाऊ शकतो.

  • नाव
  • जन्मतारीख
  • लिंग
  • पत्ता
  • भाषा

आधार डेटा किती वेळा अपडेट केला जाऊ शकतो? (How many times Aadhaar data can be updated?)
कृपया लक्षात घ्या की आधार कार्डमध्ये दिलेली माहिती दोनदा अपडेट केली जाऊ शकते. कोणताही आधार कार्डधारक फक्त एकदाच लिंग आणि जन्मतारीख बदलू शकतो. तसंच UIDAI च्या अधिकृत वेबसाइटनुसार, ‘जन्मतारीख बदलणे केवळ तेव्हाच केले जाऊ शकते जेव्हा ते आधीच अनवेरिफाइड असेल’.

ऑनलाइन अपडेटसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? (What document is required for Online Updates?)
आधार कार्डमध्ये कोणतेही अपडेट करण्यासाठी पडताळणी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जन्मतारखेसाठी नाव आणि जन्मतारीख (जन्म प्रमाणपत्र) साठी ओळखीच्या पुराव्याची (ओळखपत्र) स्कॅन केलेली प्रत जोडावी लागेल. जर तुम्हाला लिंग अपडेट करायचे असेल, तर Mobile/Face Auth द्वारे OTP ऑथेंटिकेशन द्यावे लागेल.


जर तुम्हाला आधार कार्डचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्हाला प्रूफ ऑफ अॅड्रेसची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. जर तुम्हाला फक्त आधारची भाषा अपडेट करायची असेल तर कोणतेही कागदपत्र सादर करावे लागणार नाही.