जर तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन वापरत असाल, तर तुम्ही त्यात प्रत्यक्ष सिम कार्ड घालता देखील नंबर वापरू शकता. ई-सिम कार्यक्षमतेच्या मदतीने हे शक्य झाले आहे.या कार्यक्षमतेच्या मदतीने, वापरकर्ते सिम कार्ड न घालता कोणताही नंबर वापरू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही तुमचे सध्याचे फिजिकल सिम कार्ड ई-सिममध्ये रूपांतरित करू शकता आणि त्यासंबंधीची प्रक्रिया खूप सोपी आहे.

भारतातील ई-सिम कार्यक्षमता फारशी लोकप्रिय नाही आहे. परंतु दूरसंचार सेवा प्रदाते ते पर्याय म्हणून देत आहेत. आयफोन १४ मध्ये देखील ही सुविधा आहे. नवीन ई-सिम मिळवण्याव्यतिरिक्त, तुम्ही विद्यमान फिजिकल सिम कार्ड ई-सिममध्ये रूपांतरित करू शकता.वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये त्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया.

How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
IB Recruitment 2024
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६६० पदांसाठी भरती; अशा प्रकारे करता येणार अर्ज
What is a virtual card How does it work
Money Mantra : व्हर्च्युअल कार्ड काय असतं? ते कसं काम करतं?
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ

( हे ही वाचा: Flipkart Big Billion Days sale: सॅमसंगच्या 5G फोनवर मिळतेय ५७ टक्के भरघोस सूट; लवकरात लवकर संधीचा फायदा घ्या, होईल हजारोंची बचत)

एअरटेल(Airtel)

जर तुम्ही एअरटेल वापरकर्ता असाल तर सर्वप्रथम तुम्हाला “eSIMregistred email ID” टाइप करून १२१ वर एसएमएस पाठवावा लागेल. तुम्हाला या नंबरवरून एक संदेश मिळेल, ज्याचे उत्तर तुम्हाला “१” पाठवून ई-सिम वापरायचे आहे याची पुष्टी करावी लागेल. यानंतर, ओळखीची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला एअरटेलच्या प्रतिनिधीशी कॉलवर बोलावे लागेल आणि नोंदणीकृत ईमेल आयडीवर ई-सिमचा QR कोड पाठवला जाईल. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर, तुम्ही ई-सिम वापरण्यास सक्षम व्हाल.

रिलायन्स जिओ( Reliance Jio)

रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि ३२ अंकी EID आणि १५ अंकी IMEI क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर तुम्हाला “GETESIM<32 अंक EID><15 अंक IMEI>” लिहावे लागेल आणि १९९ वर संदेश पाठवावा लागेल. यानंतर १९ अंकी व्हर्च्युअल ई-सिम क्रमांक एसएमएस आणि नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविला जाईल.आता “SIMCHG<19 अंकी e-SIM number>” टाइप करून १९९ वर एसएमएस पाठवावा लागेल. सुमारे दोन तासांनी ई-सिम विनंतीवर प्रक्रिया केल्यानंतर पुष्टीकरण संदेश येईल.

( हे ही वाचा: GB Whatsapp म्हणजे काय; ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे की नाही? ते कसे डाउनलोड कराल, सर्व काही जाणून घ्या)

Vodafone-Idea

Vi वापरकर्त्यांना त्यांच्या नंबरवरून “eSIMregistered email ID” टाइप करून १९९ वर संदेश पाठवावा लागेल.पुढील संदेशावर पुष्टीकरण दिल्यानंतर, eSIM चा QR कोड नोंदणीकृत ईमेल आयडीवर वापरकर्त्यांना पाठविला जाईल.या QR कोडच्या मदतीने, उपकरणाच्या नेटवर्क सेटिंग्जमध्ये जाऊन eSIM चा वापर सुरू केला जाऊ शकतो आणि त्यासाठी प्रत्यक्ष सिम कार्ड घालायची आवश्यकता नाही.