व्हॉट्सअ‍ॅपने अलिकडेच कम्युनिटी, इनचॅट पोल्स आणि ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे तीन फीचर लाँच केले आहेत. यामधील कम्युनिटी फीचरची इंटरनेटवर खूप चर्चा आहे. या फीचरने तुम्ही ५० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप एकत्र करून कम्युनिटी बनवू शकता. व्हॉट्सअ‍ॅपनुसार या फीचरने एका छताखाली अनेक ग्रुप येतात आणि त्यांच्यात गट संभाषण आयोजित करता येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षीच्या सुरुवातील झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी फीचरवर काम करत असल्याची घोषणा केली होती. हे फीचर युजरला त्याला महत्तवाच्या वाटणाऱ्या ग्रुपशी जोडण्यात मदत करेल. समान रूची असलेल्या लोकांना एकाच छताखाली आणणे हे या फीचरचे उद्दिष्ट आहे. युजरला आजपासून व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी हे फीचर वापरता येणार आहे.

(१० दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ, किंमत केवळ २९९९ रुपये, जाणून घ्या ‘या’ घडाळीचे भन्नाट फीचर्स)

काय आहे कम्युनिटी फीचर?

कम्युनिटीच्या माध्यमातून एकाच छत्राखाली अनेक ग्रुप्स एकत्र येतील. याद्वारे युजरला संपूर्ण कम्युनिटीला अपडेट पाठवणे किंवा ते मिळवण्यात मदत होईल. कम्युनिटी फीचरमुळे ग्रुप डिस्कशनसाठी अनेक ग्रुप एकत्र जोडता येऊ शकतात. कम्युनिटीमध्ये समावेश झाल्यावर तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रवेश करता येऊ शकते. अ‍ॅडमिनला देखील कम्युनिटीमधील सर्वांना महत्वाची माहती देता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर कम्युनिटी कसे तयार करायचे?

  • फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
  • ‘न्यू चॅटवर’ टॅप करा आणि नंतर ‘न्यू कम्युनिटी’ सिलेक्ट करा.
  • आता ‘गेट स्टार्टेड’वर टॅप करा.
  • कम्युनिटीचे नाव, डिस्क्रिप्शन आणि प्रोफाइल फोटो भरा. कम्युनिटीला नाव देण्यासाठी २४ वर्णांची मर्यादा आहे.
  • ‘कॅमेरा आयकन’वर टॅप करून तुम्ही डिस्क्रिप्शन आणि कम्युनिटी आयकन देखील जोडू शकता.
  • विद्यमान ग्रुप जोडण्यासाठी ‘नेक्स्ट’वर टॅप करा किंवा नवीन ग्रुप तयार करा.
  • कम्युनिटीमध्ये ग्रुप अ‍ॅड करून झाल्यानंतर ‘क्रिएट’वर टॅप करा.

दरम्यान कम्युनिटी फीचरबाबत काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • तुम्ही अनाउन्समेंट ग्रुपव्यतिरिक्त ५० ग्रुप अ‍ॅड करू शकता.
  • कम्युनिटी अनाउन्समेंट ग्रुपमध्ये तुम्ही ५ हजार सदस्यांचा समावेश करू शकता.
  • कम्युनिटीतील कोणत्याही सदस्याला ग्रुप्स जॉइन करता येतील.
  • तुमच्या कम्युनिटीसाठी कम्युनिटी अनाउन्समेंट ग्रुप आपोआप तयार होईल.
  • येथे कम्युनिटी अ‍ॅडमिन्सना अनाउन्समेंट ग्रुपमधील सर्व कम्युनिटी सदस्यांना मेसेज पाठवता येईल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to create community on whatsapp ssb
First published on: 08-11-2022 at 19:24 IST