scorecardresearch

Gmail मध्ये फिल्टर कसे तयार करावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स

spam ईमेल टाळण्यासाठी किंवा महत्वाचे मेल साठवून ठेवण्यासाठी Gmail मधील फिल्टर उपयुक्त आहेत.

Gmail मध्ये फिल्टर कसे तयार करावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

आपण प्रत्येकजण सोशल मीडियावरून एकमेकांशी संवाद साधत असतो. मग तो फेसबुक , इन्टाग्राम आणि व्हाट्सअँप असेल. मात्र असेच एक माध्यम आहे ज्यावरून आपण संवाद साधू शकतो ते म्हणजे G-Mail. G-Mail वरून आपण महत्वाचे ईमेल्स मेल आयडीवरून पाठवू शकतो. उदाहरणार्थ आपण जिथे काम करतो मग ते ऑफिस असेल तर तेथील महत्वाचे काम हे ईमेल द्वारे केले जाते. मात्र याच G-mail मधील spam ईमेल टाळण्यासाठी किंवा महत्वाचे मेल साठवून ठेवण्यासाठी Gmail मधील फिल्टर उपयुक्त आहेत. यामुळे युजर्सना आवश्यक नसलेले ईमेल सेव्ह करण्यासाठी किंवा डिलीट करण्यास मदतीचे ठरते. मात्र तो फिल्टर कसे करावे हे आता आपण पाहुयात.

step -1 Gmail इनबॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या चिन्हावर क्लिक करा.
step -2 आता ड्रॉप-डाउन मेनूमधून सेटिंग निवडा.
step- 3 सेटिंग पेजवरील फिल्टर आणि ब्लॉक ऍड्रेस टॅबवर क्लिक करा.
step- 4 Create a new filter button वरती क्लीक करा.
step-5 आता त्यामध्ये डोमेन चा ईमेल ऍड्रेस टाका , ज्यांचे ईमेल्स फिल्टर करायचे आहेत.
step-6 सर्च बटनावर जाऊन create filter क्लिक करा.

हेही वाचा : Consumer Electronic Show 2023: लास वेगास येथे होणार वर्षातील सर्वात मोठा Tech Show; जाणून घ्या काय असेल खास?

युजर्सना निकष पूर्ण करणार्‍या सर्व विद्यमान मेसेजसाठी फिल्टर लागू करायचे असल्यास, जुळणार्‍या संभाषणांमध्ये फिल्टर देखील लागू करून चेकबॉक्स निवडावे लागेल. फिल्टर ठेवण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी ब्लॉक ऍड्रेस वर क्लीक करावे. वेब ब्राउझर वर Gmail मध्ये एन्ड टू एन्क्रिप्शन आणणार आहे असे google ने जाहीर केले आहे. गुगलच्या मते इन्कलुडींग इनलाईन इमेजेस आणि संलग्नक एन्ड -टू -एन्ड असणार आहे. गुगल वर्कस्पेस हे संपूर्ण डेटा संलग्न करण्यासाठी नवनवीन cryptographic standards वापरत असते. क्लाएंट सैद एन्क्रिप्शन हे गुगल ड्राइव्ह , डॉक्स , शीट्स , स्लाईड्स , गुगल मीट आणि गुगल कॅलेन्डर वर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 18:31 IST

संबंधित बातम्या