Whatsapp Digital Avatar: व्हाट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे सोशल मीडिया अ‍ॅप आहे. भारतामध्ये व्हाट्सअ‍ॅपच्या यूजर्सचे प्रमाण वाढत असल्याचा पाहायला मिळते. मेटा कंपनीच्या या अ‍ॅपमध्ये दर महिन्याला नवनवीन अपडेट्स येत असतात. यामागे जुन्या ग्राहकांना टिकवून ठेवणे आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करणे हे उद्दिष्ट आहे असे म्हटले जाते. व्हाट्सअ‍ॅपमध्ये काही दिवसांपूर्वी डिजिटल अवतार तयार करण्याचे फीचर लॉन्च करण्यात आले. व्हाट्सअ‍ॅप इन्स्टाग्राम, फेसबुक अशा काही सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये डिजिटल अवतार बनवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

व्हाट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचर अंतर्गत चेहऱ्याची ठेवण, केसांची रचना, घातलेले कपडे यांवरुन अवतार तयार करता येतो. हा अवतार तुम्ही डिस्प्ले पिक्चर म्हणून लावू शकता. काहींना स्वत:चे फोटो डिपी म्हणून ठेवणे आवडत नसते. असे लोक या फीचरची मदत घेऊ शकतात. याव्यतिरिक्त तयार केलेला डिजिटल अवतार स्टिकर म्हणून मित्रांना शेअर देखील करता येतो. वेगवेगळ्या हावभावांवरुन तुम्ही नानाविध डिजिटल अवतार तयार करु शकता. पण त्याआधी हे फीचर कसे वापरायचे ते माहीत असणे आवश्यक आहे.

Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
thief disguised as garbage bag funny viral video
चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! कचऱ्याची पिशवी घालून…. Viral Video एकदा बघाच
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा

आणखी वाचा – Whatsapp webची मदत न घेता वापरा व्हाट्सअ‍ॅप; डेस्कटॉपवर व्हिडीओ कॉल करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

व्हाट्सअ‍ॅपमध्ये डिजिटल अवतार तयार करण्याच्या सोप्या स्टेप्स:

  • स्मार्टफोनवर WhatsApp सुरु करा. उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या तीन डॉट्सवर दिसतील.
  • त्या तीन डॉट्सवर क्लिक करा. पुढे त्यामध्ये ‘Settings’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • यामुळे व्हाट्सअ‍ॅपमधील पर्सनल सेटिंग्स ओपन होतील. त्यात ‘Avatar’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या हिशोबानुसार डिजिटल अवतार तयार करा.
  • तयार केलेला अवतार तुम्ही सेव्ह करु शकता. तसेच तो लगेच डिस्प्ले पिक्चरला देखील लावू शकता. शिवाय ते स्किटर म्हणून शेअर देखील करु शकता.

व्हाट्सअ‍ॅपमधील डिजिटल अवतार डिलीट करायचा असल्यास ‘Settings’ मधून ‘Avatar’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यामध्ये तुमचा डिजिटल अवतार दिसेल. त्याच्या शेजारी ‘Delete Avatar’ असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करुन तुमचा अवतार डिलीट होईल.