scorecardresearch

Linkedin Account कायमचे किंवा तात्पुर्ते बंद करायचे आहे? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स

तुम्हाला लिंक्डइन खाते तात्पुरते किंवा कायमचे बंद करायचे असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करा.

Linkedin Account कायमचे किंवा तात्पुर्ते बंद करायचे आहे? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स
(source – Reuters)

How to delete Linkedin account permanently: जॉब शोधण्यासाठी आणि आपल्या व्यवसायाशी संबंधित लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी लिंक्डइन ही चांगली सोशल मीडिया साईट आहे. मात्र, अनेक लोक नोकरी लागल्यावर किंवा गरज नसल्यास लिक्डइन फोनमधून हटवून टाकतात. तुम्हाला लिंक्डइन खाते तात्पुरते किंवा कायमचे बंद करायचे असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करा.

लिक्डइन खाते तात्पुरते बंद करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

(Photo Quality सुधारायची आहे? मग वापरा ‘या’ AI वेबसाइट्स, व्हिडिओतील बॅकग्राउंडही हटवू शकता)

 • लिक्डइनवर लॉगिन करा. त्यानंतर वरच्या भागात असलेल्या प्रोफाइल पर्यायावर क्लिक करा.
 • खाली तुम्हाला अनेक पर्याय दिसून येतील, त्यातील ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ पर्याय निवडा.
 • आता ‘अकाउंट प्रिफरेन्स’वर क्लिक करा. येथे अकाउंट मॅनेजमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ‘हायबरनेट अकाउंट’ हा पर्याय दिसून येईल, त्यावर क्लिक करा.
 • आता ‘टेंपररी डिअ‍ॅक्टिव्हेट’वर क्लिक करा. नंतर पासवर्ड टाकून खाते डिअ‍ॅक्टिव्हेट करा.

लिक्डइन खाते कायमचे बंद करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉले करा

 • लिक्डइनमध्ये लॉगइन करा आणि नंतर प्रोफाइलवर क्लिक करा.
 • त्यात ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ निवडा.
 • नंतर अकाउंट प्रिफरेन्समध्ये जाऊन ‘अकाउंट मॅनेजमेंट’वर क्लिक करा.
 • ‘क्लोज अकाउंटवर क्लिक करा’ आणि नंतर बॉक्समध्ये कारण टाकून ‘कंटिन्यू बटन’वर क्लिक करा. यानंतर पासवर्ड टाकून खाते कायमचे डिलीट करा.

लिंक्डइन खाते बंद करण्यापूर्वी त्याचा बॅकअप घ्या. काही महत्वाची माहिती असल्यास तुम्ही त्याचे जतन करू शकता. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

(टॉप ‘5 Premium Smartphone’ची यादी पाहिली का? वॉटर फ्रुफ, क्वालिटी कॅमेरासह दमदार फीचर्स, खरेदीपूर्वी टाका एक नजर)

 • प्रोफाइल पर्यायावर क्लिक करा आणि नंतर सेटिंग्स आणि प्रायव्हसी निवडा. आता ‘डेटा प्रायव्हसी’वर क्लिक करा.
 • ‘हाऊ लिंक्डइन युजेस युअर डेटा सेक्शन’मध्ये गल्यानंतर ‘गेट अ कॉपी ऑफ युअर डेटा’वर क्लिक करा.
 • यानंतर पाहिजे त्या फोटो, व्हिडिओ, मॅसेजवर क्लिक करा आणि नंतर ‘रिक्वेस्ट आर्काइव्ह’वर क्लिक केल्यानंतर त्यांना डाऊनलोड करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 17:41 IST

संबंधित बातम्या