scorecardresearch

Premium

व्हॉट्सअ‍ॅपमधील खासगी चॅट्स Hide करायचे आहेत? तर मग वापरा ‘हे’ २ Features

WhatsApp मध्ये असणारे Chats इतरांपासून लपवण्यासाठी तुम्ही या फीचरची मदत घेऊ शकता.

WhatsApp Chat Hide Features
व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स (संग्रहित फोटो)

WhatsApp Chat Hide Features: सध्या हे अ‍ॅप जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप्सपैकी एक आहे. ग्राहकांची सोय व्हावी यासाठी मेटा कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवनवीन फीचर्सचा समावेश करत असते. मागील काही दिवसांमध्ये या अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स जोडले गेले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट लपवण्याची सोय देखील करण्यात आली आहे. या नव्या फीचरमुळे तुम्ही ठराविक चॅट Hide करण्यासह ते Lock सुद्धा करु शकता. दोन सोप्या पद्धतींचा वापर करुन तुम्ही खासगी चॅट्स लपवून ठेवू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपमधील खासगी चॅट्स Hide करण्यासाठी उपयुक्त असलेले फीचर्स:

  1. Chat Lock feature

या फीचरमुळे तुम्ही खासगी चॅट लपवून ते लॉकसुद्धा करु शकता. हे फीचर Android आणि iOS दोन्हींसाठी उपलब्ध आहे. हे फीचर वापरल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या मेसेजच्या नेटिफिकेशन्स आपोआप Silent होतात. पण तुम्हाला लॉक केलेल्या चॅटमध्ये नवा मेसेज आला आहे हे आपोआप कळते.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

Step 1: चॅटवर जा > प्रोफाइलवर जा > तेथे खालच्या दिशेला तुम्हाला चॅट लॉक दिसेल.
Step 2: चॅट लॉक ऑप्शनवर क्लिक करा > फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीने चॅट लॉक करा.

या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही चॅट लपवू शकता.

टीप – लॉक केलेले चॅट्स तुम्हाला Locked Chats folder मध्ये दिसतील. फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी शिवाय हे चॅट उघडून पाहणे अशक्य आहे.

आणखी वाचा – CSK vs GT: आयपीएल २०२३ ची फायनल पाहण्यासाठी Jio आणि Airtel चे ५०० रुपयांच्या आतील ‘हे’ प्लॅन्स ठरू शकतात फायदेशीर, जाणून घ्या

  1. Archive feature

व्हॉट्सअ‍ॅपमधील Archive या ऑप्शनचा वापर करुन तुम्ही चॅट्स Hide करु शकता. ही सोय फार आधीपासून या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.

Step 1: व्हॉट्सअ‍ॅप सुरु करा > कोणत्याही चॅटवर long press करा.
Step 2: त्यानंतर येणाऱ्या Archive ऑप्शनवर क्लिक करा.

या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही चॅट Archive करुन लपवू शकता.

आणखी वाचा – बिल गेट्स यांनी वाढत्या AI स्पर्धेबाबत केलं मोठं विधान; म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोक Amazon…”

टीप: चॅट Archive केल्यानंतर त्या Archive folder मध्ये दिसतील. हे फोल्डर अ‍ॅपमध्ये वरच्या दिशेला असते. हा फोल्डर सर्वात वर दिसू नये यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन Chats पर्याय निवडावा. त्यातील Keep Chats archived हे ऑप्शन बंद करावे.

(Note – व्हॉट्सअ‍ॅपमध्ये संपूर्ण अ‍ॅप लॉक करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. यासाठी Settings > Privacy section अशा स्टेप्स फॉलो कराव्यात.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 18:29 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×