How To Know Phone Is Hacked : सायबर गुन्हेगारीची अनेक प्रकरणे दर दिवशी समोर येत आहेत. यात मोबाइल हॅक होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मोबाइल हा सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाला आहे. असा क्वचितच कोणी असेल की, ज्याच्याजवळ मोबाइल नसेल. मोबाइल वापरताना आपण अनेकदा निष्काळजीपणा दाखवतो ज्यामुळे मोबाइल हॅक होण्याची शक्यता अधिक असते. पण तुम्हाला माहिती आहे का आपला मोबाइल कसा हॅक होतो? आणि आपला मोबाइल हॅक झाला, हे कसे ओळखावे? आज आपण याविषयीही जाणून घेणार आहोत.

१. जर तुमच्या मोबाइलच्या स्क्रीनवर अयोग्य किंवा X रेटेड जाहिराती येत असतील तर कदाचित तुमचा फोन हॅक होण्याच्या मार्गावर आहे. अशा जाहिरातींना ब्लॉक करा.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
How many times we should boil milk know Correct Way To Boil Milk
Milk Boiling Tips: दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती? किती वेळा उकळावे, जाणून घ्या
Shani Planet Uday 2024
होलाष्टकात होणार शनिदेवाचा उदय! १८ दिवसांनी ‘या’ राशींना होणार धनलाभ? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
farmer protest marathi news, farmer protest for msp, minimum support price marathi news
टीकाकारांना हमीदर मागणाऱ्या शेतकऱ्यांइतकी समज कधी येणार?

२. जर तुमच्या मोबाइलवर अनोळखी कॉल किंवा मेसेज येत असतील तर कदाचित तुमचा फोन हॅक झाला असू शकतो.

३. जर तुमचे डेटा बिल अपेक्षेपेक्षा जास्त येत असेल तर कदाचित तुमचा फोन हॅक होऊ शकतो. फ्रॉड करणारी व्यक्ती बॅकग्राउंड अॅप वापरण्यासाठी तुमच्या फोनचा डाटा वापरत असेल तर तुमचे डेटा बिल जास्त येऊ शकते.

हेही वाचा : तंत्रज्ञानाचा वापर असाही! चॅटजीपीचा वापर करुन प्रसिद्ध लेखकाने लिहिली तब्बल १०० पुस्तकं; एका वर्षामध्ये कमावले ‘इतके’ पैसे

४. जर तुमची बॅटरी खूप लवकर डाऊन होत असेल किंवा सतत गरम होत असेल तर तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे.

५. जर तुमचा फोन स्लो काम करत असेल किंवा अचानक तुमचा स्क्रीन फ्रिज होत असेल किंवा अचानक फोन रिस्टार्ट होत असेल तर तुमचा फोन कदाचित हॅक झालेला असू शकतो.

६. जर तुमच्या मोबाइलमध्ये काही अनोळखी अ‍ॅप्लिकेशन्स आपोआप डाऊनलोड होत असतील तर हे काम हॅकरचे असू शकते. त्यामुळे फोन वापरताना काळजी घ्या.

७. जर काही संशयास्पद गोष्टी तुमच्या सोशल मीडिया किंवा ई-मेल अकाउंटवर आढळून आल्या, तर समजून घ्या तुमचा फोन हॅक झालाय आणि हॅकरनी तुमच्या सोशल मीडिया किंवा ई-मेल अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळवला आहे.

हेही वाचा : जुना लॅपटॉप विकत घेताय? ‘या’ गोष्टी आधी तपासा; नाही तर होऊ शकते तुमची फसवणूक

मोबाइल हॅक होऊ नये म्हणून काय करावे?

१. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
२. स्वत:ची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका.
३. कोणतेही अ‍ॅप अधिकृत प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.
४. सोशल मीडिया किंवा ई-मेल किंवा फोनचा पासवर्ड दर महिन्याने बदला.
५. पासवर्ड, ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका.