‘तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाउंट हॅक झाले आहे!’ असा मेसेज आला तर कोणालाही टेन्शन येऊ शकते. कारण यामुळे व्हॉटसअ‍ॅपवर असणारा आपला वैयक्तिक डेटा चोरी होण्याची शक्यता असते. आपण दिवसभरात बराच वेळ व्हॉटसअ‍ॅप वापरतो, आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी किंवा कामानिमित्त ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी सतत व्हॉटसअ‍ॅपवरून संपर्कात राहण्यासाठी आपण व्हॉटसअ‍ॅपवर अवलंबून असतो. व्हॉटसअ‍ॅप अकाउंट हॅक होऊ नये, यासाठी तुम्ही कोणते वर्जन वापरत आहात हे महत्त्वाचे ठरते. व्हॉटसअ‍ॅपचे काही वर्जन वापरल्यास त्यातून तुमचे अकाउंट हॅक होऊन तुम्ही स्कॅमचे शिकार होऊ शकता. कोणते आहेत हे वर्जन जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यो व्हॉटसअ‍ॅप

सायबर सिक्युरिटी एक्सपर्टसच्या रिपोर्टनुसार ‘यो व्हॉटसअ‍ॅप’सारख्या वर्जनचा वापर केल्यास डेटा चोरी होऊ शकतो. ‘यो व्हॉटसअ‍ॅप’च्या 2.22.11.75 वर्जनमध्ये एक मालवेअर आढळते. जे फोनमध्ये ॲक्टिव्ह होऊन डेटा चोरी करू शकते.

आणखी वाचा : WhatsApp चे प्रत्येक नवे फीचर सर्वात आधी तुम्हाला वापरता येणार; फक्त वापरा ‘ही’ ट्रिक

मॉडेड वर्जन
व्हॉटसअ‍ॅपच्या ‘मॉडेड वर्जन’मध्ये मूळ व्हॉटसअ‍ॅपपेक्षा अधिक फीचर्स दिले जातात त्यामुळे युजर्स त्याकडे आकर्षित होऊन ते डाउनलोड करतात. पण यामध्ये आढळणारे मालवेअर फोनचा कंट्रोल मिळवतात, ते कोणत्याही साईटवर जाऊन सब्सक्राइब करू शकतात. यामध्ये तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.

जीबी व्हॉटसअ‍ॅप
हे इतर दोन वर्जन प्रमाणे व्हॉटसअ‍ॅपचे अनऑफिशियल व्हर्जन आहे. सायबर सिक्युरिटी फॉर्म ‘इएसइटी’ (ESET) ने दिलेल्या माहितीनुसार जीबी व्हॉटसअ‍ॅपमधून युजर्सचा डेटा चोरी होत होता. या वर्जनचे भारतात अनेक युजर्स आहेत. हे वर्जन एपीके फाइल्समधून डाउनलोड केले जातात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to know whatsapp scam these alternative of the app might harm you know more pns
First published on: 19-10-2022 at 18:28 IST