भारतासह जगभरात एटीएमचा वापर केला जात आहे. त्याच्या मदतीने रोख रक्कम काढणे खूप सोपे झाले आहे. एकीकडे ते सोयीचे असले तरी दुसरीकडे त्याचा योग्य वापर केला नाही तर लाखोंचा गंडा लागू शकतो. जर तुम्हाला अद्याप त्याचे धोके माहित नसतील तर एटीएम मधून पैसे काढताना काेणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • एटीएम पिन

एटीएम पिन अतिशय जपून वापरा. लक्षात ठेवा की तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात तेव्हा तिथे कोणीही नाही. इतर कोणी असल्यास, त्यांना जाण्यास सांगा आणि संशय असल्यास त्या एटीएममधून ताबडतोब बाहेर या.

  • एटीएम तपासा

एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी, एटीएमच्या आतील बाजूस एक नजर टाका आणि कोणताही छुपा कॅमेरा स्थापित केलेला तर नाही ना हे तपासा. एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासा. काही वेळा बदमाश कार्ड स्लॉटच्या आसपास कार्ड रीडर चिप लावतात, ज्यामुळे एटीएम कार्डचा डेटा चोरला जातो आणि तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.

(हे ही वाचा : जिओ सॅटेलाइट इंटरनेट लाँच करणार; ‘या’ कंपन्यांना देणार टक्कर )

  • एटीएम पिन आणि कार्ड कोणालाही देऊ नका

घाईघाईत पैसे काढण्यासाठी अनेकदा आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन देतो. अशी चूक करू नका. आजकाल अशा घटनाही समोर येत आहेत ज्यात जवळच्या लोकांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. जर तुम्ही चुकून एटीएम पिन आणि कार्ड कुणाला दिले असेल तर ताबडतोब कार्डचा पिन बदला.

  • अनोळखी व्यक्तींच्या मदतीला बळी पडू नका

एटीएम वापरताना कोणाचीही मदत घेण्याचा प्रयत्न करू नका. पैसे काढायला थोडा जास्त वेळ लागला तरी एटीएमजवळ कोणालाही येऊ देऊ नका आणि कार्ड आणि पिन सांगू नका. हे लोक तुम्हाला चर्चेत ठेवतील आणि कार्ड रीडरच्या मदतीने एटीएम कार्ड स्कॅन करतील आणि संपूर्ण तपशील काढतील आणि तुमच्या लक्षातही येणार नाहीत.

(हे ही वाचा : मोबाईल तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे? ‘हा’ कोड वापरा आणि लगेच जाणून घ्या )

  • पिन लपवा

पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएममध्ये पिन टाका तेव्हा लपवा. एटीएम कीबोर्ड आपल्या हाताने झाकण्याचा प्रयत्न करा. तसेच, शक्य तितक्या एटीएम मशीनच्या जवळ उभे रहा. जेणेकरून पिन सहज लपवता येईल.

  • कॅन्सल बटण दाबा

एटीएममधून पैसे काढल्यानंतर, व्यवहार पूर्ण होईपर्यंत तिथेच थांबा आणि शेवटी कॅन्सल बटण दाबल्याशिवाय एटीएममधून बाहेर पडू नका.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to protect yourself with atm fraud pdb
First published on: 15-09-2022 at 11:24 IST