फेसबूक हे मेटाचे सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. या सोशल मीडिया ॲपचे जगभरात २ बिलीयनपेक्षा अधिक युजर्स आहेत. फेसबूकवर एखादे अकाउंट डिलीट केल्यानंतरही त्यावर शेअर करण्यात आलेली वैयक्तिक माहिती फेसबूक डेटाबेसमध्ये सेव्ह केळी जाते, हे अनेकांना माहित नसते. फोन नंबर, ईमेल अशी माहिती फेसबूक डेटाबेसमध्ये सेव्ह राहते, ही माहिती डिलीट करण्यासाठी सिक्रेट टूल हा पर्याय मेटाकडुन उपलब्ध करण्यात आला आहे. कसे वापरायचे सिक्रेट टूल जाणून घ्या.

असे वापरा फेसबूकचे सिक्रेट टूल

  • फेसबूक सुरू करून त्यामध्ये कॉन्टॅक्ट रिमूवल टूल उघडा.
  • तिथे तुम्ही शेअर केलेला मोबाइल नंबर, लॅंडलाइन नंबर, ईमेल शोधण्यास सांगितले जाईल.
  • याची निवड केल्यानंतर नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर मेटाला तुमचा फोन नंबर कुठे शोधता येईल (इन्स्टाग्राम किंवा फेसबूक) हा पर्याय निवडा.
  • नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधीच्या नंबरवर ओटीपी शेअर केला जाईल, त्यांनंतर हा ओटीपी विचारण्यात आलेल्या पर्यायामध्ये द्या.
  • जर तुमचा नंबर डेटाबेसमध्ये सेव्ह असेल तर फेसबुक तुम्हाला तो नंबर डिलिट करण्याचा किंवा ब्लॉक करण्याचा पर्याय देईल. त्यानंतर ‘कन्फर्म’ पर्याय निवडा.