भारत सरकारने UPI सिस्टीम सुरू केल्यापासून भारतात ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत. UPI आधारित अनेक Apps गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. फोन पे हे एक UPI आधारित अॅप आहे, UPI ही सेवा NPCI द्वारे ऑपरेट केली जाते. बँकिंग सेवेसाठी UPI System चा वापर केला जातो. UPI चा वापर करणे अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे आपण अनेक ऑनलाईन पेमेंट करू शकतो. फोन पे अॅप ज्याला तुम्ही मोबाइल वॉलेट देखील म्हणू शकता. कारण या अॅपच्या मदतीने तुम्ही मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, मनी ट्रान्सफर, ऑनलाइन शॉपिंग, फास्टटॅग खरेदी करणे इत्यादी करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही PhonePe App चा वापर करून ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकता. आणि तुम्हाला कॅशबॅक देखील मिळेल. तसेच जर तुम्ही वेगवेगळ्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले, तर हे अॅप तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. कारण तुम्ही फोन पे मध्ये एकापेक्षा जास्त बँक खाती जोडू शकता. PhonePe आपल्या युजर्सना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक पर्याय देते. या अॅपच्या मदतीने तुम्ही देशातील कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. जाणून घ्या PhonePe वरून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सर्वात सोपी प्रक्रिया.

(आणखी वाचा : मस्तच! Google चा ‘हा’ भन्नाट फीचर्स व्हॉट्सअॅपसारखं करेल काम; आता मजा होणार दुप्पट, पाहा काय आहे तुमच्यासाठी खास…)

PhonePe वरून बँक खात्यात ‘या’ पद्धतीने करा पैसे ट्रान्सफर

१. सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवर PhonePe अॅप उघडावे लागेल.

२. अॅपच्या होमपेजवर, तुम्हाला Money Transfers मध्ये To Bank/UPI ID आयडीवर क्लिक करावे लागेल.

३. त्यानंतर तुम्हाला खाली वायलेट रंगाच्या बॉक्समध्ये दाखवलेल्या Add Recipient Bank Account वर क्लिक करावे लागेल.

४. Add Recipient Bank Account वर क्लिक केल्यानंतर, ज्याच्या खात्यात तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, त्या व्यक्तीचे तुम्हाला बँकेचे नाव निवडावे लागेल.

५. बँक निवडल्यानंतर, तुमच्या मोबाइल फोनच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, जिथे बँकेचे नाव असेल.

६. त्याच्या खाली, तुम्हाला ज्या बँक खात्यात पैसे पाठवायचे आहेत त्याचा नंबर टाकावा लागेल.

७. बँक खाते क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला त्याखालील बँकेच्या शाखेचा IFSC कोड टाकावा लागेल.

८. खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकल्यानंतर, बँकेचे नाव आणि शाखेचा पत्ता आणि खातेधारकाचे नाव तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

९. खातेदाराचे नाव, बँकेचे नाव आणि शाखेच्या पत्त्याची खात्री केल्यानंतर, खाली दर्शविलेल्या Proceed to Pay वर क्लिक करा.

१०. Proceed to Pay वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम टाका आणि Pay वर क्लिक करा आणि नंतर तुमचा UPI पिन टाका आणि सबमिट करा.

११. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर, तुमच्या PhonePe वरून पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पोहोचतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to transfer money from phonepe to bank account see complete process here pdb
First published on: 04-12-2022 at 12:03 IST