Google Photos ही गुगलद्वारे दिली जाणारी सेवा आहे. प्रत्येक Android स्मार्टफोनमध्ये गुगल फोटोज उपलब्ध असते. बहुतांश यूजर्स फोटो स्मार्टफोनमध्ये सेव्ह करण्याऐवजी ते गुगल फोटोजमध्ये सेव्ह करत असतात. यामुळे फोटोंची क्वालिटी कमी होते असे अनेकांना वाटत असते. खरंतर गुगल फोटो स्टोअर करताना ओरिजन क्वालिटी टिकून राहते. सध्या आकाराने मोठे असलेले फोटो देखील क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करता येतात. यामार्फत फोटोंसह अन्य फाइल्सचा बॅकअपदेखील घेता येतोय

गेल्या काही वर्षांमध्ये लोक गुगल फोटोजचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहेत. परिणामी त्यांच्या अकाउंटमधील जागा भरली जात आहे. Android प्रणाली सुरुळीतपणे काम करण्यासाठी स्मार्टफोनच्या स्टोरेजमध्ये ठराविक प्रमाणात जागा असणे आवश्यक असते. असे न केल्यास फोन योग्य पद्धतीने काम करत नाही. ही समस्या उद्भवू नये यासाठी Free Up Space ची मदत घेता येते.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

Free Up Space चा वापर कसा करावा?

गुगल फोटोजमध्ये फोटोचा बॅकअप घेतल्यानंतर स्मार्टफोनमधील ओरिजनल फाइल्स हटवता येतात. स्टोअर केलेला डेटा (फोटो, व्हिडीओ, फाइल्स) क्लाउड आणि स्मार्टफोन अशा दोन ठिकाणांमध्ये असतो. गुगल फोटोजमधील ‘Free up space’ या टूलचा वापर करुन सुरक्षितपणे बॅकअप घेतलेली कोणतही फाइल डिलीट करता येते. या टूलचा वापर करुन स्टोरेजशी संबंधित समस्या दूर होतात.

आणखी वाचा – Google Maps ने लॉन्च केलेल्या ‘या’ फिचरमुळे नवीन शहरात फिरणे होणार सोपे, जाणून घ्या

Free Up Space वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • गुगल फोटोज अ‍ॅप उघडा आणि त्यामध्ये Library टॅबवर क्लिक करा.
  • असे केल्यानंतर सुरु झालेल्या टॅबमध्ये वरच्या बाजूला Utilities असे लिहिलेले दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यावर Free Up Space हा ऑप्शन दिसेल.
  • त्यात लोकल फोटो कॉपी डिलीट करण्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करा.

आणखी वाचा – गूगलचे AI टूल Bard जीमेलच्या डेटाचा वापर करतो? कंपनीने दिलं स्पष्टीकरण; म्हटलं…

नोट : ही प्रक्रिया सुरु झाल्यावर गुगलद्वारे क्लाउडमध्ये कॉपी असलेले फोटो काढून टाकण्यात येतील. स्मार्टफोनमधले लोकल फोटो सेफ राहतील. डेटाच्या आकारानुसार तो डिलीट व्हायला किती वेळ लागू शकतो हे ठरत असते.