How To Use Same WhatsApp Number On Two Mobiles : जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲप्लिकेशन्सपैकी एक म्हणजे व्हॉट्सॲप. वैयक्तिक चॅट्स असो किंवा कामानिमित्त एखादा संवाद साधण्यासाठी या ॲपवर सगळेच अवलंबून असतात. पण, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त उपकरणे आहेत त्यांच्यासाठी एकाच वेळी अनेक उपकरणांवर व्हॉट्सॲप ॲक्सेस करणे खरोखरच गेम चेंजर ठरू शकते. तर यासाठी तुम्हाला लिंक डिव्हायसेस (Linked Devices) फीचर मदत करू शकते, जे विविध डिव्हाइसवर एकच अकाउंट वापरण्याचा सोपा मार्ग ऑफर करते, मग तो दुसरा फोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप असो.

व्हॉट्सअ‍ॅपच्या लिंक डिव्हायसेस (Linked Devices) फीचरमुळे युजर्सना त्यांचा प्रायमरी फोन ऑफलाइन असला तरीही चार अतिरिक्त डिव्हायसेसवर (उपकरणांवर) त्यांचे खाते ॲक्सेस करण्यास परवानगी देते. प्रत्येक युजर्स क्यूआर कोड स्कॅन करून, दुसरा फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप लिंक करून करू शकतात. पण, कॉलिंग फीचर्स प्राथमिक डिव्हायसेससाठीच उपलब्ध असतील.

Rujuta Diwekar Shared Anti inflammation diets tips
‘टीव्ही, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम करा बंद… ‘ अँटी-इन्फ्लमेटरी डाएटबद्दल सेलिब्रिटी डाएटिशियन Rujuta Diwekar ने नक्की काय सांगितले?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
WhatsApps hawala in Malegaon scam Transactions worth Rs 1000 crore found Mumbai news
मालेगाव गैरव्यवहारात व्हॉट्सअॅपचा ‘हवाला’; एक हजार कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे निष्पन्न
How To Access DeepSeek On Web
ChatGPT आणि Gemini ला देणार टक्कर! DeepSeek चा नक्की कसा करायचा वापर?
Who is Liang Wenfeng?
Liang Wenfeng : लियांग वेंगफेंगची जगभर चर्चा! कोण आहे अमेरिकेत खळबळ उडवून देणाऱ्या ‘डीपसीक’चा कर्ताधर्ता?
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
How to send WhatsApp messages without save a number know 5 easy methods
मोबाइल नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या पाच सोप्या पद्धती…
whatsaapp
WhatsApp Messages : व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलिट केलेले मेसेज कसे वाचावेत? Android आणि iOS दोन्हीसाठी जाणून घ्या पद्धत

दोन फोनमध्ये एकच व्हॉट्सॲप नंबर कसा वापरायचा?

तुम्हाला दुसरा ॲण्ड्रॉईड फोन किंवा iPhone वर WhatsApp वापरायचे असल्यास, या सोप्या स्टेप्स फॉलो करा…

१. तुमच्या प्रायमरी फोनमधील व्हॉट्सॲप उघडा.

२. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात, सेटिंग्ज उघडण्यासाठी तीन ठिपक्यांवर (मेनू चिन्ह) टॅप करा. मेनूमधून लिंक्ड डिव्हायसेस पर्याय निवडा.

३. Linked Devices सेक्शनमध्ये आल्यावर, Linked Devices वर टॅप करा. त्यानंतर क्यूआर कोड ॲक्टिव्हेट होईल.

४. नंतर तुमच्या दुसऱ्या फोनवर जा. जर तिथे व्हॉट्सॲप इन्स्टॉल नसेल, तर आधी ॲप इन्स्टॉल करा आणि उघडा.

५. तुमच्या दुसऱ्या फोनवर तुम्ही वेगळा नंबर वापरत असल्यास, तुम्हाला त्या नंबरसह लॉग इन करण्याची सूचना येईल. हे टाळण्यासाठी दुसऱ्या फोनमधील स्क्रीनच्या वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर टॅप करा आणि Link as a Companion Device हा पर्याय निवडा.

६. दुसऱ्या फोनवर एक क्यूआर कोड दिसेल. हा कोड स्कॅन करण्यासाठी तुमच्या पहिल्या फोनवर क्यूअर स्कॅनर वापरा. एकदा स्कॅन यशस्वी झाल्यानंतर, तुमचे व्हॉट्सॲप चॅट लोड होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही दोन्ही फोनवर तुमची संभाषणे पाहू शकाल.

हेही वाचा…Poco C75 : भारतातला सर्वांत कमी किमतीचा ५जी स्मार्टफोन! 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह असणार अनेक फीचर्स

लॅपटॉपवर व्हॉट्सॲप कसे लिंक कराल?

व्हॉट्सॲप युजर्सना त्यांचे अकाउंट लॅपटॉप, डेस्कटॉप, कॉम्प्युटरवर लिंक करण्याची परवानगीदेखील देतो. संगणक, लॅपटॉपवर बराच वेळ काम करणाऱ्यांसाठी हे खूप गरजेचे आहे.

१. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर वेब ब्राउजर उघडा आणि web.whatsapp.com वर जा.

२. तुम्हाला स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल.

३. आता तुमच्या पहिल्या फोनवरील व्हॉट्सॲपवर परत जा. लिंक्ड डिव्हायसेस सेक्शन उघडण्यासाठी वरच्या-उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर टॅप करा.

४. Linked Devices सेक्शनमध्ये Linked Devices करा हा पर्याय निवडा. त्यानंतर व्हॉट्सॲप वेब पेजवर दिसणारा QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचा फोन वापरा.

५. एकदा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुमचे व्हॉट्सॲप चॅट वेब व्हर्जनशी sync होतील आणि तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर व्हॉट्सॲप वापरणे तुम्ही सुरू करू शकता.

एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरताना पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत : …

१. ॲक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन –

लिंक केलेल्या डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुमच्या पहिल्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे महत्त्वाचे आहे. पण, तुम्ही लिंक केलेले डिव्हाइस स्वतंत्रपणे ऑपरेट करू शकतात.

२. डिव्हाइसच्या संख्येची मर्यादा –

व्हॉट्सॲप तुम्हाला एकाच वेळी चार डिव्हायसेस लिंक करण्याची अनुमती देते. हे अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना एका वेळी अनेक डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरण्याची आवश्यकता आहे.

३. सुरक्षेचा विचार –

यादरम्यान प्रत्येक युजरने सुरक्षिततेची काळजी घ्यावी. तुम्ही तुमचा डिव्हाइस फक्त विश्वसनीय डिव्हाइसशी लिंक करत आहात ना याची नेहमी खात्री करून घ्या. तुम्ही यापुढे एखाद्या विशिष्ट डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरू इच्छित नसल्यास, तुम्ही ते डिव्हाइस लिंक केलेल्या डिव्हाइसेस विभागातून काढून (remove) टाकू शकता.

४. क्रॉस-प्लॅटफॉर्म कॉम्पॅटिबिलिटी –

व्हॉट्सॲपच्या लिंक्ड डिव्हाइसेस फीचर ॲण्ड्रॉइड आणि आयओएसदरम्यान अखंडपणे कार्य करते. जोपर्यंत दोन्ही डिव्हाइस ॲपची नवीन व्हर्जन येत नाही तोपर्यंत तुम्ही Android डिव्हाइससह आयफोनसुद्धा लिंक करू शकता.

५. फोन कॉल –

तुम्ही लिंक केल्यावर एकापेक्षा अनेक डिव्हाईसवर एसएमएस पाठवू आणि प्राप्त करू शकता. परंतु, व्हॉइस किंवा व्हिडीओ कॉल करणे सध्या लिंक केलेल्या डिव्हाइसवर करणे शक्य नाही.

Story img Loader