scorecardresearch

Premium

Chandrayaan-3: चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहण्यासाठी इस्रोकडून खास व्यवस्था; ‘या’ ठिकाणी करावी लागेल नोंदणी

Chandrayaan-3 Mission Launch: भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Chandrayaan-3 Launch India Moon Mission
चांद्रयान-३ लॉन्च थेट प्रक्षेपण (Image Credit- Twitter/@isro)

India Moon Mission Update: भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल. ६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर लँडर व रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. त्यामुळे भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

चांद्रयान-३ च्या लँडरने २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित आहे. ६१५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या चांद्रयान -३ या मोहिमेचे उद्दिष्ट हे रोव्हरला चंद्राच्या कक्षेमध्ये पोचवणे व चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे हे आहे.

Indian Army NCC Special Entry Scheme 2024
Indian Army 2024 : एनसीसी विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा जाणून घ्या
Gyanvapi
“ज्ञानवापी मशीद हिंदूंच्या ताब्यात द्या’, केंद्रीय मंत्र्याचे मुस्लीमांना आवाहन; म्हणाले, “सलोखा राखण्यासाठी…”
Mumbai Highcourt
“मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले
ram mandir
सोहळय़ासाठी अयोध्या भक्तिमय; सुरक्षेसाठी एआयची मदत, भूसुरुंगविरोधी ड्रोन तैनात, हजारो वाहनांच्या पार्किंगसाठी ५१ ठिकाणी व्यवस्था

अवकाशात गेल्यावर Chandrayaan-3 हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. प्रत्येक प्रदक्षिणा घालतांना पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि एका त्यानंतर एका विशिष्ट अंतरावरुन ते चंद्राकडे रवाना होईल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मगच Chandrayaan-3 हे चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर अलगद उतरल्यावर लँडरमधून रोव्हर हा प्रत्यक्ष चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. या मोहिमेतून चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘चंद्रयान-३’ मोहीम काय आहे?

Chandrayaan-3 Launch: कुठे आणि कसे पाहता येणार ऑनलाईन ?

राष्ट्रीय अंतराळ संस्थेने नागरिकांना चंद्रयान- ३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. नागरिकांना हे थेट प्रक्षेपण https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION या लिंकवर नोंदणी करून SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्हयू गॅलरीतून पाहता येणार आहे. ISRO ने द्विट करत नागरिकांना हे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

”वाहनाचे विद्युत परीक्षण पूर्ण झाले.नागरिकांना https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATIO येथे रजिस्ट्रेशन करून SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले जाते.” इस्रोने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे.

राष्ट्रीय अंतराळ संस्थेने चंद्रयान-3 मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे स्थापित केली आहेत – चंद्रावर सुरक्षित लँडिंग, चंद्राच्या पृष्ठभागावर फिरण्याची रोव्हरची क्षमता प्रदर्शित करणे आणि थेट साइटवर वैज्ञानिक निरीक्षणे घेणे.

यासह चांद्रयान -३ चे थेट प्रक्षेपण इस्रोच्या वेबसाईटवर, फेसबुक आणि युट्युबवर देखील पाहता येणार आहे.

चांद्रयान २ मोहिमेत काय झालं होतं ?

चांद्रयानन २ मोहिम ही जुलै २०१९ ला झाली आणि ऑगस्ट महिन्यात चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वेग नियंत्रित न झाल्याने चंद्रावर उतरणारे लॅडर हे चंद्राच्या जमिनीवर आदळळे होते आणि त्याचे तुकडे झाले होते. मात्र या मोहिमेत चंद्राभोवती एक उपग्रह हा कक्षेत स्थिर करण्यात इस्त्रोला यश आले होते. हा उपग्रह चंद्राभोवती अजुनही फिरत असून त्याने चंद्राच्या जमिनीचा नकाशा तयार केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to watch live stream chandrayaan 3 mega lunch isro india check all details tmb 01

First published on: 13-07-2023 at 10:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×