Airtel Recharge Plan : बरेचजण ड्युअल सिम कार्ड म्हणजेच दोन सिम कार्ड वापरतात. दोन सिम कार्ड म्हणजे त्यांच्या रिचार्जचा खर्चही दुप्पट येतो. अशावेळी फक्त कार्ड ऍक्टिव्हेट रहावे म्हणजेच चालू राहावे यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची निवड केली जाते. जर तुम्ही एअरटेलचे सिम एक्स्ट्रा सिम म्हणून वापरत असाल, तर एअरटेलचे स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते आहेत जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरटेलचा ९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • २८ दिवसांसाठी उपलब्ध होणारा हा प्लॅन इमर्जन्सी वापरासाठी ९९ रुपयांचा टॉकटाइम आणि २००एमबी डेटा ऑफर करतो.
  • या प्लॅनमध्ये सर्व लोकल/एसटीडी/एलएल कॉलसाठी प्रति सेकंद २.५ रुपये आकारले जातात.
  • एसएमएस पाठवण्यासाठी वापरकर्त्यांना लोकल एसएमएससाठी १ रुपये आणि एका एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये शुल्क आकारले जाईल.
  • इमर्जन्सी डेटा संपल्यास वापरकर्त्यांना प्रति एमबी ५० पैसे आकारले जातील.

आणखी वाचा : ५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळणार! जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या

एअरटेलचा १०९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनवर ९९ रुपयांची टॉकटाइम ऑफर ३० दिवसांसाठी उपलब्ध होते.
  • सर्व लोकल/एसटीडी/एलएल कॉल्सवरील टॉकटाइमसाठी २.५ रुपये प्रति सेकंद आकारले जातात.
  • या रिचार्ज प्लॅनवर २०० एमबी इमर्जन्सी डेटा ऑफर केला जातो. तसेच प्रति लोकल एसएमएससाठी १ रुपया आकारला जातो.

एअरटेलचा १११ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • हा रिचार्जप्लॅन एका महिन्यासाठी उपलब्ध होतो, म्हणजे जर महिना २८ दिवस, ३० दिवस किंवा ३१ दिवसांचा असल्यास, हा रिचार्ज प्लॅन तेवढ्या दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • लोकल/एसटीडी/एलएल कॉलसाठी २.५ रुपये प्रति सेकंद टॉकटाइम शुल्क आकारला जातो.
  • स्थानिक एसएमएससाठी १ रुपये आणि प्रति एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये आकारले जातात. यासह २००MB डेटा उपलब्ध होतो.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are using airtel as secondary number then these recharge plan might be helpful for keeping your card active pns
First published on: 28-09-2022 at 12:11 IST