Aadhaar : आधार कार्डचे डिटेल्स चुकीच्या हातात तर नाही ना गेले? अशा पद्धतीने तपासा

तुमचे आधार कार्ड इतर कोणीतरी त्यांच्या बँक खात्यात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेत वापरत असतील तर भविष्यात तुमच्यासमोर एखादं मोठं संकट येऊ शकतं. तुमचं आधार कार्ड कुणी वापरत आहे का? हे तपासण्याठीची प्रक्रिया जाणून घ्या.

Adhaar-Card

आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे देशातील सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले आहेत. इतर ओळखपत्र मिळवण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. तर पॅन कार्डचा वापर आर्थिक व्यवहार आणि बँकिंग सुविधांसाठी केला जातो. अशा स्थितीत या दोन्ही कागदपत्रांशी संबंधित बनावटीला वेग आला आहे. कारण बरेच लोक इतरांच्या ओळखीवर लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा स्थितीत तुमच्या आधार कार्डमध्ये फसवणूक झाल्याचा संशय आल्यास त्याची चौकशी करून संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवावी.


शाळेत प्रवेशापासून ते रेशन सरकारी दुकानापर्यंत सर्वच ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड गरजेचं असतं. त्याचबरोबर सरकारने अनेक महत्त्वाच्या योजनांमध्येही आधार कार्ड लिंक केलं आहे. अशा परिस्थितीत तुमचे आधार कार्ड इतर कोणीतरी त्यांच्या बँक खात्यात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेत वापरत असतील तर भविष्यात तुमच्यासमोर एखादं मोठं संकट येऊ शकतं.

UIDAI ने एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्यावरून तुमचं आधार कार्ड कुठे कुठे वापरले जात आहे, हे कळु शकतं. तुमचं आधार कार्ड कुठे वापरलं जात आहे, हे तुम्ही तपासू शकता.

आधार कार्डची हिस्ट्री कशी तपासायची ?

आधार कार्डची हिस्ट्री तपासण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा.
यानंतर My Aadhaar च्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर आधार सेवा पर्यायाखाली आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या समोर एक विंडो उघडेल ज्यामध्ये 12 अंकी आधार क्रमांक टाका.
त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
त्यानंतर OTP टाका.
यानंतर आधारचा हिस्ट्री तुमच्यासमोर ओपन होईल आणि नंतर डाउनलोड करा.
कोणत्याही चुकीच्या व्यक्तीने तुमचा आधार वापरला असेल तर त्याची त्वरित तक्रार करा.
आधार हा एक अतिशय महत्त्वाचा कागदपत्र आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळे त्याचा इतिहास वेळोवेळी तपासत राहा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If your aadhar card details are not in the wrong hand find out like this prp

Next Story
BSNL चा ‘हा’ प्लॅन Jio, Airtel आणि Vi पेक्षाही स्वस्त! ९० दिवसांची अतिरिक्त वैधता आणि बरेच काही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी