scorecardresearch

Heating Lamp In Winters: थंडीपासून बचाव करेल ‘हा’ बल्ब; मिनिटांत करतो घर गरम, किंमत फक्त…

Heating Lamp In Winters: ‘या’ बल्बने खोली तर उजळून निघतेच पण याने थंडीपासून संरक्षण करता येते.

Heating Lamp In Winters: थंडीपासून बचाव करेल ‘हा’ बल्ब; मिनिटांत करतो घर गरम, किंमत फक्त…
Infrared Light करेल तुमची खोली गरम. (Photo-pexels)

Heating Lamp in Winters: थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, गारव्यात वाढ झाल्याचे दिसत आहे. या थंडीपासून वाचण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत आहेत. स्वेटर, मफलर घालून लोक बाहेर पडत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा बल्ब विषयी माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला थंडीपासून बचाव करता येईल. अनेक लोक आपली खोली गरम करण्यासाठी रूम हीटर विकत घेतात. परंतु, याची किंमत खूप जास्त असते. मात्र तुम्ही आता एका बल्बमुळे खोली गरम करू शकता.

थंडीपासून बचाव करेल ‘हा’ बल्ब

तुम्ही यापूर्वी ऐकले नसेल कि एक बल्ब खोली गरम करू शकतो. परंतु, हा एक बल्ब इन्फ्रारेड बल्ब आहे. त्यामुळे तो संपूर्ण खोली गरम करतो. कमी किमतीत या बल्बचे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. हा साधा बल्ब नाही, जो चालू केल्यावर खोली उजळून निघते, या बल्बने खोली तर उजळून निघतेच पण याने खोली गरमही होते. हा लाल रंगाचा बल्ब खास हिवाळ्यात वापरला जातो. जाणून घेऊयात या बल्बची खासियत आणि किंमत.

(आणखी वाचा : Telegram Bots ने होणार तुमचे काम अधिक सोपे, तसेच होईल तुमच्या वेळेचेही बचत; जाणून घ्या कसे?)

  • चीटिंग बल्ब
    इन्फ्रारेड लाइटला त्याच्या वैशिष्ट्यामुळे चीटिंग बल्ब असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे इन्फ्रारेड बल्ब वापरल्याने जास्त उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात या बल्बचा वापर करून घरातील खोल्या गरम करता येतात.
  • हीटर म्हणून करते काम
    ज्या पद्धतीने खोली गरम करण्यासाठी रूम हीटरचा वापर केला जातो, त्याच पद्धतीने हा बल्बही काम करतो. हिवाळ्यात, तुम्ही तुमची खोली गरम करण्यासाठी हीटर वापरत असल्यास, तुम्ही त्याऐवजी इन्फ्रारेड बल्ब वापरू शकता. कोणत्याही सामान्य बल्बपेक्षा सर्वात जास्त गरम देते.
  • इन्फ्रारेड बल्बची किंमत किती?
    तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पर्यायांसह इन्फ्रारेड बल्ब खरेदी करू शकता. साध्या बल्बची किंमत साधारणतः १०० ते ३०० रुपयांपर्यंत असते. तथापि, इन्फ्रारेड बल्बची किंमत (इन्फ्रारेड लाइट किंमत) रु.३८० पर्यंत आहे. तुम्ही ते Amazon वरून खरेदी करू शकता. त्याचा रंग लाल असून तो सामान्य बल्बपेक्षा वेगळा दिसतो. ते चालू करून, आपण प्रकाशाद्वारे खोली गरम करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 17:25 IST

संबंधित बातम्या