Premium

करदात्यांसाठी महत्वाची बातमी! आयकर विभागाने लॉन्च केले AIS अ‍ॅप, फॉर्म 26AS वर आले ‘हे’ अपडेट

या App चा उपयोग करदात्यांना कसा होणार आहे आणि ते App कसे वापरावे हे जाणून घेऊयात.

income tax department launch AIS app for taxpayers
आयकर विभाग – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

भारतात प्रत्येक नागरिकाला आपल्या उत्पन्नाचा काही भाग सरकारला द्यावा लागतो. आपण त्याला इन्कम टॅक्स असे म्हणतो. प्रत्येक नागरिकाला हा टॅक्स भरावाच लागतो. कधी कधी तो भरत असताना ऑनलाईन स्वरूपात आलेल्या अडचणींमुळे भरला जात नाही किंवा भरला गेला तरी त्यासंबंधित मेसेज आपल्याला मिळत नाही. मात्र आता करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागाने AIS नावाचे एक नवीन App लॉन्च केले आहे. या App चा उपयोग करदात्यांना कसा होणार आहे आणि ते App कसे वापरावे हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयकर विभागाने AIS अ‍ॅप लॉन्च केले असून, या अ‍ॅपमध्ये करदात्यांना प्रत्येक व्यवहाराची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच IT विभागाने फॉर्म २६AS वर अपडेट जारी केले आहे. त्यात फक्त तुम्हाला TDS/TCS डेटा दिसतो. अ‍ॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ-असेसमेंट टॅक्स, रिफंड यासारखी माहिती आता AIS अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा : Tech Layoff: Meta मध्ये नोकरकपात सुरुच, १५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार; CEO झुकरबर्ग म्हणाले, “ही परिस्थिती…”

AIS App कसे डाउनलोड करावे ?

१. सर्वात पहिल्यांदा Google Play Store वर जावे.
२. गुगल प्ले स्टोअरवर AIS for Taxpayers असे सर्च करावे.
३. त्यानंतर ते इंस्टाल करा.

वार्षिक इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजेच AIS करदात्यांच्या आर्थिक वर्षात केलेल्या व्यवहारांचा संपूर्ण डेटा ठेवते. ITR फाईल भरण्यासाठी याचा फार फायदा होतो. AIS मध्ये अतिरिक्त व्यवहाराची माहिती असते. व्याजदर, लाभांश, सुरक्षा व्यवहार, म्युच्युअल फंड याप्रमाणे परदेशात पाठवलेल्या पैशांची संपूर्ण माहिती असते.

हेही वाचा : Google कडून मोठी घोषणा! आता ‘या’ अ‍ॅप्ससाठी करता येणार नवीन AI फीचर्सचा वापर

वार्षिक इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजेच AIS करदात्यांच्या आर्थिक वर्षात केलेल्या व्यवहारांचा संपूर्ण डेटा ठेवते. ITR फाईल भरण्यासाठी याचा फार फायदा होतो. AIS मध्ये अतिरिक्त व्यवहाराची माहिती असते. व्याजदर, लाभांश, सुरक्षा व्यवहार, म्युच्युअल फंड याप्रमाणे परदेशात पाठवलेल्या पैशांची संपूर्ण माहिती असते.

फॉर्म 26AS म्हणजे काय?

फॉर्म 26AS अंतर्गत आर्थिक दरम्यान कर कपात, गोळा केलेली आणि पॅनची संपूर्ण माहिती असते. आयटीआर भरताना करदात्यांकडे पॅनसह टॅक्स पासबुक , २६AS फॉर्म आणि आर्थिक वर्षातील व्यवहारांचा देतअसणारे आवश्यक आहे. ते डाउनलोड करण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे ई-फाइलिंगच्या मेनू बारमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न सिलेक्ट करावे. तिथे तुम्ही 26AS फॉर्म पाहू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 14:44 IST
Next Story
Tech Layoff: Meta मध्ये नोकरकपात सुरुच, १५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार; CEO झुकरबर्ग म्हणाले, “ही परिस्थिती…”