Google हे एक सर्च इंजिन आहे. याचा वापर प्रत्येकजण करत असतो. यावर आपण आपल्याला हवी ती माहिती शोधू शकतो. याच सर्च इंजिन असणाऱ्या गुगलने दोन भारतीय हॅकर्सना चक्क लाखो रुपये दिले आहेत. हे नक्की काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, तुम्ही कोणाची चूक दाखवून दिली किंवा शोधून दिली तर तर ते तुम्हाला बक्षीस म्हणून पैसे देतील. मात्र गुगल कंपनीने दोन भारतीय हॅकर्सना १८ लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. या दोन्ही हॅकर्सनी गुगलच्या क्लाउड प्रोग्राममध्ये काही त्रुटी शोधून काढल्या होत्या त्यामुळे त्यांना हे बक्षीस मिळाले आहे. गुगल हे बग बाउंटी प्रोग्राम अंतर्गत लोकांना बक्षीस देते.

हेही वाचा : IIT मद्रासने लाँच केली BharOS ऑपरेटिंग सिस्टीम; मिळणार हे जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

श्रीराम केएल आणि शिवेश अशोक या दोन भारतीय हॅकर्सनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांनी गुगलच्या सॉफ्टवेअरमध्ये विशेषतः Google क्लाउडच्या बग मधील फीचर्समध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी त्यांनी गुगलला सांगितल्या होत्या. त्यामुळे गुगल कंपनीने या दोन भारतीय हॅकर्सना १८ लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian hackers discovered some problem cloud program google offered them a reward of 18 lakhs tmb 01
First published on: 23-01-2023 at 12:43 IST