Indian Railway Passenger Data Leak : सायबर क्राइमचे प्रकार वाढले असून अलीकडेच ट्विटरच्या ४० कोटी युजर्सचा खासगी डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे समोर आले होते. हे प्रकरण ताजे असताना आता डार्क वेबवर तीन कोटी भारतीय रेल्वे प्रवाशांचा डेटा विक्रीसाठी उपलब्ध केल्याचा दावा एका हॅकर फॉरमने केला आहे. यावर भारतीय रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले असून आमची कोणतीही प्रणाली किंवा संस्थांमधून डेटाची लूट झाली नाही, असे म्हटले आहे.

दावा फेटाळत, भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये डेटा चोरी झाला नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण, आयआरसीटीसीने त्यांच्या सर्व व्यावसायिक भागीदारांना डेटा लिक झाला आहे का, याची त्वरित तपासणी करण्यास सांगितले आहे.

Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित
blow to airline
रद्द केलेल्या तिकिटाची वाढीव दराने विक्री प्रकरणी विमान कंपनीला दणका, भरपाईपोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

(एकाचवेळी ११ शहरांमध्ये लाँच झाली Jio True 5g सेवा, महाराष्ट्रातील ‘या’ २ शहरांचा समावेश)

डेटाच्या नमुन्याचे विश्लेषण केले असता, महत्वाचे पॅटर्न हे आयआरसीटीसीच्या हिस्ट्री अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसशी जुळत नाही. संशयित डेटा ब्रीच आयआरसीटीसी सर्व्हरकडून झालेला नाही, असे प्रवक्त्याने म्हटले आहे.

४० कोटी Twitter युजर्सचा डेटा विक्रीला

नव्या अहवालानुसार, हॅकरने ट्विटरच्या ४० कोटी युजर्सचा खासगी डेटा चोरी केला आहे. यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. सर्व खासगी डेटा डार्कवेबवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

(गुगलच नव्हे, Zomato अ‍ॅपवरीह सर्वाधिक सर्च झाले मस्क, ‘Elon Musk Food’ टाकताच मिळाले ‘हे’ रिजल्ट)

इस्रायलची सायबर इंटेलिजेन्स कंपनी हुडसन रॉकच्या अहवालानुसार, विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या डेटामध्ये ईमेल, नाव, युजरनेम, फॉलोवर्स आणि काही प्रकरणांमध्ये फोन नंबरचा समावेश आहे. ट्विटर युजर्सचा डेटा मिळवण्याची ही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी ५.४ दशलक्ष ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाला होता. मात्र, यंदाचा डेटा लीक सर्वात मोठा आहे.