Infinix स्मार्टफोनचे उत्पादन करणारी कंपनी असून, ही कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix Note 12i असे या स्मार्टफोनचे नाव आहे. आपण या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Infinix Note 12i (2022) चे फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये ६.७ इंचाचा FHD AMOLED डिस्प्ले तसेच फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोनची बॅटरी ही ५०००mAh इतक्या क्षमतेची असणार आहे. यामध्ये ६०Hz रिफ्रेश रेट आणि १००० nits चा ब्राईटनेस येतो. तसेच या स्मार्टफोनची रॅम ही ४ जीबी असून ती ७ जीबी पर्यंत वाढवता येते. अँड्रॉइड १२ वर आधारित अशी XOS 12 ही ऑपरेटिंग सिटीम या फोनमध्ये असणार आहे.

हेही वाचा : Coca Cola लवकरच लाँच करणार आपला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टीम आहे. ज्यात ५० मेगा पिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. दुसरा कॅमेरा हा २ मेगापिक्सल आणि तिसरा कॅमेरा हा QVGA AI लेन्स असणारा कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा युजर्सना वापरता येणार आहे.

Infinix Note 12i (2022) ची किंमत

Infinix Note 12i (2022) या भारतात लवकरच लाँच होणाऱ्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही. परंतु हा फोनची किंमत ही ९,९९९ रुपयांपासून सुरु होऊ शकते. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या दोन प्रकारांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infinix company launched its infinix note 12i smartphone with attractive features tmb 01
First published on: 26-01-2023 at 09:01 IST