InBook X2 Slim Laptops: Infinix कंपनीने नुकतंच बाजारामध्ये InBook X2 हा नवा लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लॅपटॉपच्या निमित्ताने कंपनीने त्यांच्या InBook laptop segment मध्ये बदल करत असल्याचे स्पष्ट केले आहे. ९ जूनपासून Infinix कंपनीचे हे उत्पादन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही स्वस्त लॅपटॉपचा शोध घेत असाल, तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. या नव्या सीरीजमध्ये 11th-Gen Core i7 प्रोसेसर देण्यात येणार आहे. InBook X2 मध्ये रंगाचे लाल, सिल्वर, निळा आणि हिरवा असे चार प्रकार उपलब्ध आहेत.
India Today ने दिलेल्या माहितीनुसार, Infinix कंपनीच्या या नव्या लॅपटॉप सीरीजमधील लॅपटॉप्समध्ये १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोअरेज असू शकते असे म्हटले जात आहे. 11th-Gen इंटेल कोअर प्रोसेसरच्या i3, i5 आणि i7 नुसार या सीरीजमधील लॅपटॉप लॉन्च करण्यात आले आहेत. Infinix InBook X2 Slim i3 Edition हा या सीरीजमधला सर्वात स्वस्त लॅपटॉप आहे. त्याची किंमत २७,९९० रुपये इतकी आहे. या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज आहे. तर सर्वात महागड्या i7 Edition ची किंमत ५०,९९० रुपये आहे. InBook X2 सीरीजमधील लॅपटॉप्समध्ये PCle 3.0 SSD फास्ट स्टोअरेज आणि LPPDR4X रॅम आहे. तसेच त्यामध्ये 1.0 कूलिंग सिस्टीम देखील आहे.




Infinix InBook X2 सीरीजमधील लॅपटॉप्स

InBook X2 लॅपटॉप सीरीजमध्ये दोन USB 3.0 Type-A पोर्ट, एक HDMI पोर्ट आणि एक टाईप-सी पोर्ट आहे. हे लॅपटॉप्स Full HD Resolution आणि 60Hz Refresh Rate असलेला डिस्प्ले असणार आहे. डिस्प्लेचा ब्राइटनेस हा ३०० निट्स असू शकतो. लॅपटॉपमधील 50Wh बॅटरी ११ तासांसाठी चालेल असा कंपनीने दावा केला आहे. या लॅपटॉप्ससह 65W चार्जिंग अॅडाप्टर दिला जाणार आहे. लॅपटॉपमध्ये Windows 11 असणार आहे.