स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने आपल्या नोट मालिकेमधील ‘Infinix Note 12 2023’ हा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. तसेच या नोट १२ मालिकेमध्ये कंपनीने नोट 12 5G आणि Note 12 Pro 5G भारतात सादर केले आहेत. या नवीन स्मार्टफोनची खास फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

Infinix Note 12 2023 वैशिष्ट्ये
Infinix Note 12 2023 ची सर्वात महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दिलेला ६ एनएम MediaTek Helio G99 प्रोसेसर आहे. Infinix चा हा फोन 4G ऑफरसह येतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. तर स्टोरेजसाठी १२८ जीबीचा पर्याय उपलब्ध आहे. फोनच्या स्टोरेजचा वापर करून, एक्सटेंडेड रॅम वैशिष्ट्याद्वारे रॅम ५ जीबी पर्यंत वाढवता येते. हा नवीन स्मार्टफोन ब्लू, ग्रे आणि व्हाइट कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

बॅटरी

फोनमध्ये ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुलएचडी + रिझोल्यूशनसह येतो. स्क्रीनचा रिफ्रेश दर ६० Hzआहे. स्क्रीनच्या आजूबाजूला पातळ बेझल्स आढळतात. स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९२ टक्के आहे. स्क्रीनच्या मध्यभागी एक लहान खाच आहे, ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, ५०००mAhबॅटरी प्रदान करण्यात आली आहे जी ३३Wफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

आणखी वाचा : iPhone SE 2022 भारतात ६ हजार रुपयांनी महाग; जाणून घ्या नवीन किंमत

कॅमेरा

Infinix Note 12 2023 ला मागील बाजूस ड्युअल-टोन पॅनल मिळतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सेल प्राइमरी आणि AI लेन्ससह २ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या Infinix स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये डाव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम आहे तर उजव्या बाजूला सिम-ट्रे दिलेला आहे. फोन Android१२ आधारित XOS १०.६ सह येतो. या फोनची जाडी ७.८ मिमी आहे आणि वजन सुमारे १९५ ग्रॅम आहे.

Infinix Note 12 2023 किंमत

Infinix Note 12 2023 स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. फोनची किंमत $199 (सुमारे १६,४०० रुपये) आहे.