Infinix आपले नवीन बजेट प्रोडक्ट भारतात लॉंच करण्यासाठी सज्ज आहे. ही कंपनी Infinix 12 सीरीजमध्ये एक नवीन Note 12 5G स्मार्टफोन सादर करेल. याशिवाय कंपनी भारतात नवीन बजेट स्मार्ट टीव्ही आणण्याच्या तयारीत आहे. ट्रान्झिशन ग्रुपच्या मालकीची Infinix लवकरच Infinix Y1 32-इंचाची टीव्ही देशात लॉंच करणार आहे. Infinix च्या या आगामी प्रोडक्ट्सबद्दल माहिती जाणून घ्या…

सर्वप्रथम Infinix Y1 32 इंच स्मार्ट टीव्हीबद्दल बोलूयाचं झाल्यास सूत्रांनुसार, हा स्मार्ट टीव्ही देशात ११ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉंच केला जाऊ शकतो. म्हणजेच देशातील ३२ इंच स्क्रीनसह येणारा हा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही असेल. ज्यांचे बजेट कमी आहे त्यांच्यासाठी इन्फिनिक्सचा हा स्मार्ट टीव्ही उत्तम पर्याय ठरू शकतो. रिपोर्ट्सनुसार, Infinix Smart TV मध्ये प्राइम व्हिडीओ, YouTube, SonyLIV, Zee5, ErosNow, AajTak आणि Hotstar सारखे इन-बिल्ट OTT अॅप्स मिळतील. टीव्हीमध्ये HD + स्क्रीन आणि 20W डॉल्बी स्टीरिओ स्पीकर असतील.

आणखी वाचा : Airtel चा ९१२ GB डेटाचा प्लॅन माहितेय? १ वर्षाचा रिचार्ज आणि अनलिमिटेड कॉल्स, फ्री हॉटस्टार

Infinix Note 12 5G Specifications
Infinix Note 12 5G स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन अधिकृतरित्या लॉंच होण्यापूर्वी कंपनीने उघड केले आहेत. Flipkart च्या मते, Infinix Note 12 5G हा 5G नेटवर्क सपोर्टसह येणारा कंपनीचा पहिला फोन आहे. हा फोन लवकरच भारतात लॉंच होणार आहे. मात्र, कंपनीने अद्याप लॉंचची तारीख जाहीर केलेली नाही. Amoled डिस्प्ले Note 12 सीरीज 5G स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल. सध्या स्क्रीनमध्ये रिफ्रेश रेट पॅनेल सपोर्टबद्दल कोणतीही माहिती नाही.

आणखी वाचा : iQOO Flagship Days: 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्ण संधी, १३ हजार रूपयांपेक्षा जास्त बचत

याशिवाय, कंपनीने खात्री दिली आहे की Note 12 5G मध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. फ्लिपकार्टवरील एका टीझरमध्ये समोर आले आहे की, फोनमध्ये ट्रिपल-रिअर कॅमेरा सेटअप असेल. डिव्हाईसमध्ये अल्ट्रावाइड कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर दिला जाईल. कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅश मॉड्यूल देखील प्रदान केले आहे. मायक्रोसाइट उघड करते की फोनच्या डिस्प्लेच्या सभोवताली पातळ बेझल असतील. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, मायक्रोफोन आणि तळाशी प्राथमिक स्पीकर ग्रिल असेल. फोनमध्ये ३.५ mm हेडफोन जॅक दिला जाऊ शकतो. Note 12 5G डार्क ब्लू कलर व्यतिरिक्त अनेक रंगांमध्ये लॉंच होण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत फोनबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.