Infinix Zero Ultra 5G Launch India : इन्फिनिक्सने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Infinix Zero Ultra 5G लाँच केला आहे. या फोनमध्ये ४५०० एमएएचची बॅटरी मिळत असून हा फोन १२ मिनिटांत ० ते १०० टक्के फूल चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये कोणते फीचर्स मिळतात आणि त्याची किंमत काय? जाणून घेऊया.

फीचर्स

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
a cloth seller told foreigner how to sell clothes funny video goes viral
“एकसो पचास मे दो….” कापड विक्रेत्याने फॉरेनरला शिकवले की कपडे कसे विकायचे…
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
Thief snatched the chain from woman neck and ran away cctv video
चोर निकल के भागा! धावत्या ट्रेनमध्ये चोर महिलेची सोनसाखळी चोरून पसार; प्रवाशांनो “हा” VIDEO एकदा बघाच

Infinix Zero Ultra 5G हा ड्युअल सीम फोन असून त्यात मीडियाटेक डायमेन्सिटी ९२० ६ एनएम ऑक्टाकोअर प्रोसेसरसह ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये २५६ जीबीची स्टोअरेज मिळते जी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. युजर्स व्हर्च्युअल पद्धतीने रॅम १३ जीबी पर्यंत वाढवू शकतात.

(अरे वा! आता फोटोमधील हवी ती वस्तू शोधता येईल, ‘असे’ वापरा गुगलचे Multisearch Feature)

स्मार्टफोनमध्ये ६.८ इंच फूल एचडी कर्व्ह ३ डी अमोलेड डिस्प्ले मिळतो. स्क्रीनला ‘गोरीला ग्लास ३’ची सुरक्षा मिळाली आहे. फोन अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित एक्सओएसवर चालतो. फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोनमध्ये ४ हजार ५०० एमएएचची बॅटरी आणि १८० वॉट थंडर फास्ट चार्जिंग मिळते. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.

(गेमर्ससाठी पर्वणी! Amazon Prime Gaming लाँच झाले, फ्रीमध्ये डाऊनलोड करा ‘हे’ जबरदस्त गेम्स)

किंमत

Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. फोन कोसलाइट सिलव्हर आणि जेनेसिस नॉइर या दोन रंग पर्यायांसह उपलब्ध आहे. फोन फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सच्या माध्यमातून भारतात उपलब्ध होईल. हा फोन २५ डिसेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होइल. लाँच ऑफर म्हणून फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड होल्डर्सना ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफर्स आणि नो कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ घेता येईल.