जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया फेसबुकची मूळ कंपनी, मेटा प्लॅटफॉर्म आता आपल्या इंन्स्टाग्रामवरील रिल्स बनवणाऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे. मेटाच्या माहितीनुसार, प्रोफाईल फिडमध्ये जाहीराती चालतील का, यावर सध्या मेटाकडून चाचणी सुरु आहे. पहिल्यांदा युएसएच्या क्रिएटर्ससाठी हे फीचर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे देखील मेटाकडून सांगण्यात आले आहे.

नुकतेच वापरकर्त्यांना सध्या इंन्स्टाग्रामकडून नोट्स या नावाने एक नवीन फिचर देण्यात आले आहे. इंन्स्टाग्राम स्टोरी सारखा तुम्ही साठ शब्दात लिहून याचा वापर करू शकता. आपल्या फाॅलोअर्सना हे दिसणार आहे. या फीचरच्या माध्यमातून मेटाने इंन्स्टाग्रामला अधिक लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न चालवला आहे. रिल्स बनवणाऱ्यांसाठी तर इंन्स्टाग्राम त्यांच्या प्रोफाईलला जाहीरातीच्या माध्यमातून देखील संधी उपलब्ध करून देत आहे. आपल्या प्रोफाईलवरून रिल्स बनवणाऱ्यांना जाहीराती देखील करता येणार आहेत.

आणखी वाचा : WhatsApp Hack : तुमचं व्हॉटसअ‍ॅप अकाउंट दुसर कोणी वापरतय का? ‘ही’ ट्रिक वापरुन लगेच ओळखा

अप्लिकेशनच्या वापराचा अधिकाधिक फायदा हा वापरकर्त्यांना व्हावा आणि त्यातून माहितीची देवाण-घेवाण व्हावी हा उद्देश या कंपनीचा असतो. अर्थातच यातून कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा देखील होत असतो. असाच फायदा आता मेटा कंपनी आपल्या इंन्स्टाग्रामवरील रिल्स बनवणाऱ्यांना देणार आहे. रिल्स बनवणारे आपल्या रिल्सचा फायदा आता उत्पन्नाचे मोठे साधन म्हणून करू शकणार आहेत.