यूट्यूब, फेसबुक, स्पॉटिफाय आदी अनेक ॲप्सवर स्क्रोल करताना किंवा गाणी ऐकताना स्किप न करता येणाऱ्या जाहिराती पाहाव्या लागतात. तर, यूट्यूब, फेसबुकवर काही जाहिराती आपण स्किपही करू शकतो. पण, काही ॲप्सवर जाहिराती स्किप करणे शक्य नसते. त्यामुळे स्क्रोल करताना, थोडा वेळ थांबून ती जाहिरात जबरदस्तीने का होईना पाहावीच लागते. आता या ॲप्सच्या यादीत इन्स्टाग्राम ॲपचासुद्धा समावेश होणार आहे.

इन्स्टाग्राम ‘ॲड ब्रेक्स’ (ad breaks) नावाच्या नवीन फीचरची चाचणी करीत आहे; जे वापरकर्त्यांना रील्स किंवा एखादी पोस्ट स्क्रोल करणे सुरू ठेवण्यापूर्वी विशिष्ट कालावधीसाठी जाहिरात पाहण्यास भाग पाडणार आहे. ही चाचणी एक्स (X) आणि Reddit वर अनेक युजर्सनी पाहिली किंवा ऐकली असेल. तसेच इन्स्टाग्रामचे स्पोक्स पर्सन मॅथ्यू टाय यांनी सांगितले की, जबरदस्तीच्या जाहिरातींमुळे कंपनीला फायदाही होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो. पण, याचा अंतिम निर्णय कंपनीवर अवलंबून असेल.

हेही वाचा…Aadhaar Card Update: फ्रीमध्ये करा तुमच्या आधार कार्डमध्ये बदल! फक्त एकच आठवडा राहिलाय शिल्लक; ‘ही’ कागदपत्रे ठेवा जवळ

इन्स्टाग्राम स्टोरी आणि पोस्ट स्क्रोल करताना युजर्सना ‘ॲड ब्रेक्स’ फीचरचा सामना करावा लागेल; उदाहरणार्थ- युजर तेव्हा स्क्रोल करीत असतील. इन्स्टाग्राम एक काउंटडाउन टायमर स्क्रीनवर दाखवेल. हा टायमर संपेपर्यंत तुम्हाला न स्किप करता, ही जाहिरात पाहावी लागेल. म्हणजेच युजर्सना स्क्रोल करून पुढे जाणंही शक्य होणार नाही. एका Reddit युजरनंसुद्धा या फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे; ज्यामध्ये टायमरसह ‘ॲड ब्रेक’ चिन्ह आहे.

यादरम्यान जेव्हा वापरकर्ते more details या चिन्हावर टॅप करतात. तेव्हा इन्स्टाग्राम तुम्हाला एक मेसेज दाखवेल. त्यात लिहिलेलं असतं, “ॲड ब्रेक्स हा इन्स्टाग्रामवर जाहिराती पाहण्याचा एक नवीन मार्ग आहे. स्क्रोलिंग सुरू ठेवण्यापूर्वी तुम्हाला जाहिरात पाहावी लागेल.” या फीचरबद्दल युजर्सनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.