scorecardresearch

Instagram Reels Hacks: कमी व्ह्यूजमुळे रील डिलीट करणे ठरेल मोठी चूक; अल्गोरिदम जाणून घ्या

काही डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार तुमची रील तुम्ही पोस्ट केल्यानंतर भविष्यात कधीही व्हायरल होऊ शकते

Instagram Reels Hacks: कमी व्ह्यूजमुळे रील डिलीट करणे ठरेल मोठी चूक; अल्गोरिदम जाणून घ्या
Instagram Reels Hacks (फोटो: Financial Express)

How to get More Views On Reel: तुम्ही तास अन तास मेहनत करून एक रील बनवता, त्याला साजेसा फिल्टर, कॅप्शन लावून शक्य तेवढे हॅशटॅग टाकून शेअर करता पण पोस्ट केल्यावर व्ह्यूज मात्र १००.. २०० इतकेच! किती वेळा स्क्रोल केलं तरी फार ५०० पर्यंत व्ह्यूज जात आहेत. अर्थात हे बघून कोणालाही संताप येणार, मन नाराज होऊन, ‘जाऊदे ही रील चालणार नाही डिलीटच करून टाकू’ असा सल्ला देणार… पण थांबा! केवळ व्ह्यूज चांगले आले नाहीत म्हणून रील डिलीट करणे ही मोठी चूक ठरू शकते. काही डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार तुमची रील तुम्ही पोस्ट केल्यानंतर भविष्यात कधीही व्हायरल होऊ शकते. इंस्टाग्रामचे अल्गोरिदम रीलच्या बाबत कसे काम करते हे आज आपण पाहणार आहोत..

इंस्टाग्राम अल्गोरिदम युजरच्या भूतकाळातील ऍक्टिव्हिटीच्या आधारावर रील दाखवते. त्यामुळे तुम्ही बनवलेली रील ही भविष्यात व्हायरल होणाऱ्या अन्य व्हिडिओला मिळती जुळती असेल तर नंतरही व्हायरल होऊ शकते. सहसा ट्रेंडिंग ऑडिओ वर बनवलेल्या रील या अशाच प्रकारे व्हायरल होतात .

इंस्टाग्रामवर जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट करता तेव्हा त्याला किती लाईक व कमेंट येतात म्हणजेच त्यावर किती जण खिळून राहतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. जे तुम्हाला पोस्ट एंगेजमेंट मधून समजते, त्यामुळे समजा जर तुमच्या रीलला १०० व्ह्यूज असतील पण त्यातील ७० जणांनी पोस्ट लाईक केलेली असेल तर ते गणित तुमच्या फायद्याचे आहे. अशा अधिक एंगेजमेंटच्या रील भविष्यात कधीही व्हायरल होऊ शकतात.

Video: उर्फी जावेदला सुद्धा भारी पडेल ‘ही’ इंस्टाग्राम मॉडेल; नुसत्या कागदाने बनवते भन्नाट ड्रेस, पहा

जर तुम्ही आजवर न झालेल्या विषयावर पहिल्यांदाच रील बनवत आहात तर सुरुवातीला तुम्हाला कमी रिच मिळते पण जसजसे त्यावर अधिकाधिक व्हिडीओज येऊ लागतात इंस्टाग्राम सर्वात पहिले बनवलेल्या व्हिडिओला अधिक लोकांपर्यंत पोहचवते.

जर काही दिवस वाट बघूनही तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसेल तर तुम्ही खालील काही उपाय करून पाहू शकता.

  • बदलत्या ट्रेंडनुसार तुमच्या रील मधील कॅप्शन किंवा हॅशटॅग मध्ये बदल करा.
  • तुम्हाला जर फीड मध्ये कमी व्ह्यूज असणारी रील ठेवायचीच नसेल तर तिला Archive करण्याचा पर्याय विचारात घ्या.
  • तुमची रील तुम्ही स्वतःच्या स्टोरी मध्ये शेअर करू शकता, शेअर केल्याने एंगेजमेंट वाढते आणि त्यातून व्हिडीओ अधिक जणांपर्यंत पोहोचतो.

युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या नात्यात फूट? आधी इन्स्टाग्रामवरून नाव केलं डिलीट आणि आता..

इंस्टाग्राम वर व्हायरल होण्यासाठी प्रत्येक क्रिएटरचा वेगळा फंडा असतो. मात्र पोस्ट करण्याच्या वेळा, हॅशटॅग या गोष्टी योग्य निवडल्यास तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो. विविध वेळा ट्राय करून तुम्हाला पोस्टिंगसाठी वेळ निवडा. तुम्ही जितका वेगळा आणि हटके कॉन्टेन्ट बनवाल तितका तो व्हायरल होईल हे ही लक्षात घ्या.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Instagram reels hacks why not to delete reels with low views check algorithm svs

ताज्या बातम्या