महागड्या किमतीमुळे तुम्ही आयफोन खरेदी करू शकत नसाल, तर कदाचित हा फोन खरेदी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. आयफोन १४ सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे पण त्याआधी कंपनीने आपल्या सर्व आयफोन मॉडेल्सवर मोठी सूट आणली आहे. पण सर्वात विशेष सवलत आयफोन१२ वर दिली जात आहे. हा फोन तुम्ही ५१,९०० रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला माहित असेल की कंपनीने हा फोन ७९,९०० रुपयांना लाँच केला होता. म्हणजे आता हा फोन लाँचच्या किंमतीपेक्षा २८,००० रुपये कमी किमतीत उपलब्ध झाला आहे. ही ऑफर मुकेश अंबानींच्या कंपनी रिलायन्स डिजिटलवर उपलब्ध आहे. आयफोन १२ सोबत, येथे इतर काही ऑफर देखील उपलब्ध आहेत.

Apple iPhone 12 5G ऑफर

रिलायन्स डिजिटलवरील ॲपल्ल आयफोन १२ ५जी च्या ऑफरबद्दल बोलायचं झालं तर त्याचे ६४जीबी मॉडेल ५४,९०० रुपयांना उपलब्ध आहे. दुसरीकडे, तुम्ही HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास, तुम्हाला ३,००० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. त्याच वेळी, प्रथमच वापरकर्त्यांसाठी, कंपनी ५०० रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. याशिवाय, तुम्ही MobiKwik सह पेमेंट केल्यास १,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि Indus Bank क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर १५०० रुपयांची सूट आहे. एकूणच, कंपनी मोठ्या ऑफर्स देत आहे. इतर साइट्सवर हा फोन थोड्या जास्त किमतीत उपलब्ध आहे.

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
92 crores recovered from the implementation of Mumbai Maharera orders
मुंबई महारेराच्या आदेशांच्या अंमलबजावणीतून ९२ कोटींची वसुली

( हे ही वाचा: लवकरच लाँच होणार iPhone 14; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही)

Apple iPhone 12 5G चे तपशील

ॲपल्ल आयफोन १२ ५जी मध्ये ६.१ इंच स्क्रीन आहे. कंपनीने एज-टू-एज OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले वापरला आहे जो २५३२x ११७० पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. हा फोन HDR 10 आणि HLG HDR ला सपोर्ट करतो. समोर, तुम्हाला सुपर वाईड नॉच मिळेल ज्यावर सेल्फी कॅमेरा आणि फेस आयडी उपलब्ध आहे. त्याच वेळी, फोनची बॉडी सिरॅमिक शील्डची आहे जी खूप मजबूत मानली जाते. हा फोन A14 बायोनिक चिपसेटवर काम करतो. यासोबतच ॲपल्ल आयफोन १२ ५जी मध्ये १२एमपी सेन्सर असलेला मुख्य कॅमेरा आहे. कंपनीने ड्युअल सेन्सरचा वापर केला आहे. कॅमेरासह, तुम्हाला OIS, १२० डिग्री FoV, f/1.8 अपर्चर मिळते, जे 2x ऑप्टिकल झूम पर्यंत सपोर्ट करते. समोर १२एमपी कॅमेरा देखील आहे.