उत्तम कॅमेरा आणि चोख सुरक्षा प्रणाली ही अ‍ॅप्पल आयफोनची ओळख आहे. आयफोनच्या नव्या व्हर्जनचे लोक उत्सुक्तेने वाट पाहत आहेत. आयफोन १४ सिरीज ७ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. या पार्शवभूमीवर सध्या आयफोन १३ हा अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाइन रिटेलिंग स्टोअर्सवर उपलब्ध आहे. मात्र, फ्लिपकार्टवर या फोनच्या किमतीत मोठी सूट देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवरही हा फोन काही ऑफर्ससह उपलब्ध आहे, मात्र फ्लिपकार्टची डील सध्या चांगली आहे. दोन्ही स्टोअर्सवर आयफोन १३ चा बेस १२८ जीबी मॉडेल हा ६९,९९९ वर उपलब्ध आहे. मात्र, ही किंमत अजून कशी कमी होऊ शकते याबाबत जाणून घेऊया.

अ‍ॅमेझॉनवर हा ऑफर

आयफोन १३ 14 हजार 900 पर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. या क्षणी अ‍ॅमेझॉनवर इतर कोणतेही बँक डिल्स नाहीत, परंतु, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल शॉपिंग दरम्यान बरेच पर्याय मिळण्याची शक्यता आहे. हा फेस्टिव्हल या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे.

(OnePlus 9 5G फोन झाला १२,००० रुपयांनी कमी; महिन्याला १,७८९ रुपये देऊन शक्तिशाली स्मार्टफोन घरी आणा)

फ्लिपकार्टवर आयफोन १३ एक्सचेंज डीलसह उपलब्ध

फ्लिपकार्टवर आयफोन १३ एक्सचेंज डीलसह उपलब्ध आहे. त्याशिवाय, एचडीएफसी बँकेच्या क्रिडिट कार्डवर (नॉन इएमआय व्यवहार) २ हजार रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बिग बिलियन डे मध्ये देखील आयफोनची किंमत अजून घसरण्याची शक्यता आहे.

हे आहेत फिचर्स

दोन्ही प्लॅटफॉर्मवर अनेक रंग पर्यायांमध्ये आयफोन 13 विक्रीसाठी उपलब्ध आहे. आयफोन १३ हा अजूनही बाजारात सर्वात आकर्षक स्मार्टफोन्सपैकी एक आहे. तो अ‍ॅप्पलच्या ए १५ बायोनिक चिपसेट आणि ड्युअल 12 मेगापिक्सेल कॅमेर्‍यांसह येतो. समोर, दुसरा 12 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. आयफोन 13 मध्ये चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट आहे. बॉक्समध्ये चार्जर येत नाही. इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये फेस आयडी, ५ जी, 6.1 इंचचा ओएलईडी डिस्प्ले आणि ग्लास बॅक यांचा समावेश आहे.

(जिओचा ३१ दिवसांचा ‘Calender Month Plan’! मिळेल फ्री कॉलिंग आणि भरपूर डेटा)