scorecardresearch

iPhone 13 वर सर्वात मोठी सूट; अवघ्या ४३ हजारात व्हा आयफोनचे मालक, फ्लिपकार्टची ऑफर जाणून घ्या

iPhone 13 Flipkart Sale Price: iPhone 13 चा १२८ जीबीचा फोन आता फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या ऑफरचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता व यातून नेमके किती रुपये वाचवता येतील हे जाणून घेऊया..

iPhone 13 वर सर्वात मोठी सूट; अवघ्या ४३ हजारात व्हा आयफोनचे मालक, फ्लिपकार्टची ऑफर जाणून घ्या
iPhone 13 वर डिस्काउंट. (Photo-financialexpress)

iPhone 13 Flipkart Sale Price: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल आजपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स आणि बरेच काही यासह विविध श्रेणीतील उत्पादनांवर सूट देण्यात आली आहे. तुम्हाला आयफोन खरेदी करण्यास इच्छा असल्यास हा सेल तुमच्यासाठी सर्वात खास ठरणार आहे. iPhone 13 चा १२८ जीबीचा फोन आता फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. अवघ्या ४३ हजार रुपयात आपण हा फोन खरेदी करू शकतात. गुलाबी, निळा, मिडनाईट ब्लॅक, स्टारलाईट, हिरवा, लाल या रंगांमध्ये हा iPhone 13 उपलब्ध असणार आहे. या ऑफरचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता व यातून नेमके किती रुपये वाचवता येतील हे जाणून घेऊया..

Flipkart ची ऑफर

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेच्या अंतर्गत iPhone 13 हा अगोदरच सूट देऊन ६३ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. याशिवाय जर आपण एसबीआय किंवा एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरून पेमेंट करणार असाल तर तुम्हाला आणखी १००० रुपयांची सूट मिळू शकते. तसेच जर आपण आपला जुना फोन देऊन एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्यावर सुद्धा १७ हजार ५०० रुपयांची सूट मिळू शकते. यासाठी तुमचा जुना फोन हा व्यवस्थित काम करत आहे याची खात्री करा. काही निवडक सदस्यांना फ्लिपकार्टकडून अतिरिक्त ३००० रुपयांची सूट सुद्धा मिळणार आहे. या एकूण ऑफर्स व डिस्काउंटसह iPhone 13 आपण अवघ्या ४२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता.

iPhone 13 चे फीचर्स

iPhone 13 हा Apple A15 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित आहे. iPhone 14 प्रमाणेच या फोनमध्ये तो 6.1-इंच सुपर रेटिना XDR स्क्रीन आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी देण्यात आली आहे. iPhone 13 तीन स्टोरेज मॉडेल्समध्ये येतो – 128GB, 256GB आणि 512GB. iPhone 13 मध्ये समोरील बाजूस 12MP सेल्फी कॅमेरा आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. मागील कॅमेरामध्ये 12MP रुंद सेन्सर आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे.

हे ही वाचा<< Jio 5G Welcome Offer अंतर्गत अनलिमिटेड 5G डेटा मिळणार Free! फायदा घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

5G, 4G VoLTE, 4G LTE, UMTS, GSM, Wi-Fi 6 (802.11ax) 2×2 MIMO सह आणि ब्लूटूथ आवृत्ती 5.0 हे डिव्हाइसवरील कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. हँडसेट Apple च्या iOS15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि नवीनतम iOS 16 ऑपरेटिंग सिस्टमसाठी फोन सक्षम आहे. iPhone 13 पाणी आणि धूळ-प्रतिरोधक टिकाऊ डिझाइनसह उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 10:34 IST

संबंधित बातम्या