scorecardresearch

Premium

iPhone 15 सिरीजच्या लॉन्चिंगआधी ‘हा’ आयफोन केवळ २४ हजारांमध्ये खरेदी करण्याची संधी, ऑफर्स एकदा पाहाच

आयफोन १५ सिरीज उद्या लॉन्च होणार आहे.

iphone 13 mini massive discount on flipkart
आयफोन १३ मिनीमध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. (image Credit-Financial Express)

उद्या म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी Apple कंपनीचा एक wonderlust इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च कणार आहे. आयफोन १५ हा एक बहुप्रतीक्षित स्मार्टफोन आहे. ज्यात आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर कंपनी आयफोन १३ मिनी हा स्मार्टफोन बंद केला जाणार आहे. आयफोन १३ मिनी कंपनीचे दुसरे मिनी आयफोन मॉडेल होते. कंपनीने काही काळानंतर मिनी फोन तयार करणे बंद केले होते. आयफोन १४ सिरीजऐवजी कंपनीने एक नवीन प्लस मॉडेल सादर केले होते. सध्या आयफोन १५ सिरीज लॉन्च होण्यापूर्वी आयफोन १३ मिनी वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. हा डिस्काउंट फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

कमी किंमतीमध्ये आयफोन १३ मिनी कमी किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी आहे. आयफोन १३ मिनी स्मार्टफोन ६९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आयफोन १३ मिनी हा आयफोन १३ या सिरीजमधील बेस मॉडेल होते. ज्यामध्ये आयफोन १३ , आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्सचा समावेश आहे. आयफोन १३ मिनीमध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. हुड अंतर्गत या फोनला फ्लॅगशिप A15 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट मिळतो. स्मार्टफोनमध्ये ४ के डॉल्बी व्हिजनसह HDR रेकॉर्डिंगसह १२ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये ट्रू डेप्थ असा १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

dr sudhir mehta pinnacle industries, pinnacle industries dr sudhir mehta
वर्धापनदिन विशेष : वाहन निर्मितीतील नावीन्याचा ध्यास
Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
Paytm Fastag
Paytm Fastag Deactivate कसं कराल? सहज-सोप्या पद्धती जाणून घ्या!
1700 houses will be drawn under 20 percent scheme from MHADA Pune division Pune
लोकसभेच्या तोंडावर पुणेकरांना गिफ्ट; म्हाडाकडून १७०० घरांची सोडत

हेही वाचा : Apple Event 2023: उद्या लॉन्च होणार iPhone 15 सिरीज; कोणत्या मॉडेलच्या किंमतीत किती होणार वाढ? जाणून घ्या

काय आहेत ऑफर्स ?

आयफोन १३ मिनी हा स्मार्टफोन ६९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. मात्र सध्या हा आयफोन २३,८९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्टमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १३ मिनीची किंमत फ्लिपकार्टवर सध्या ७,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर ६१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय HDFC बँकेच्या खरेदी आणि डेबिट कार्डच्या EMI व्यवहारांवर २ हजारांचा डिस्काउंट मिळू शकतो.

यामुळे आयफोन १३ मिनी स्मार्टफोनची किंमत ५९,९९९ रुपये इतकी होते. याशिवाय खरेदीदार जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ३६,१०० रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकतात. सर्व डिस्काउंट आणि बँक ऑफर्स पाहिल्यानंतर फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन १३ मिनी स्मार्टफोन केवळ २३, ८९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iphone 13 mini buy 23899 rs 38100 rs discount flipkart before iphone 15 series luanching check offers tmb 01

First published on: 11-09-2023 at 16:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×