iPhone 14 Launch Date Announced: ॲपल्ल हा एकमेव ब्रँड आहे जो वर्षभरात निवडक मोबाईल फोन आणतो आणि त्या मॉडेल्सच्या आधारे टेक जगात कायम अव्वलस्थानी राहतो. Apple iPhones वर्षातून एकदाच लाँच होऊन पूर्ण प्रसिद्धी घेतात. आता ही संधी पुन्हा एकदा येणार आहे. ॲपल्लची नवीन आयफोन १४ सीरीज लाँच होणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे की ॲपल्ल आयफोन १४ अधिकृतपणे ७ सप्टेंबर रोजी सादर केला जाईल. सीरीज अंतर्गत, आयफोन १४, आयफोन १४ मॅक्स, आयफोन १४ प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स ७ सप्टेंबर रोजी लाँच केले जाऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Apple iPhone 14 मालिका लाँच

आयफोन १४ सीरीजच्या लाँचबद्दल माहिती देताना ॲपल्लने सांगितले आहे की कंपनी ७ सप्टेंबर रोजी ॲपल्ल इव्हेंट आयोजित करणार आहे. हा कार्यक्रम कंपनीच्या स्वतःच्या ॲपल्ल पार्क कॅम्पसमध्ये होणार आहे, ज्याचे जगभरात थेट प्रक्षेपण केले जाईल. हा लाँच इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरू होईल, जो ॲपल्लच्या अधिकृत वेबसाइटवर कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

( हे ही वाचा: 13,999 रुपयांमध्ये खरेदी करा Apple iPhone SE; Flipkart ने दिलीय आकर्षक सूट)

ॲपल्लने या इव्हेंट दरम्यान लाँच केल्या जाणार्‍या सर्व उत्पादनांबद्दल माहिती दिली नसली तरी, असे मानले जाते की आयफोन १४ मालिका त्याच इव्हेंट प्लॅटफॉर्मवरून सादर केली जाईल आणि त्यात आयफोन १४, आयफोन १४ मॅक्स, आयफोन १४ प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स यांचा समावेश असेल. आयफोन १४ सिरीज सोबत Apple Watch Series ८ चे अनावरण कंपनीकडून ७ सप्टेंबरला ॲपल्ल इव्हेंटमध्ये केले जाऊ शकते.

Apple iPhone 14 Series Specification

ॲपल्लच्या नवीन मोबाईल सीरीज अंतर्गत आयफोन १४, आयफोन १४ मॅक्स, आयफोन १४ प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स लाँच केले जाऊ शकतात. या आयफोनचे स्पेसिफिकेशन्स विविध लीक्समध्ये शेअर केले गेले आहेत, ज्याद्वारे दाखवण्यात आलंय की, आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ मॅक्स नेहमी-ऑन डिस्प्लेला सपोर्ट करेल. सर्व आयफोनमध्ये सर्वात मोठा स्क्रीन आकार ६.७ इंच आहे, जो प्रो मॅक्स मॉडेलमध्ये पाहिला जाऊ शकतो.

( हे ही वाचा: IPhone 11 मिळतोय २५,००० पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची जबरदस्त ऑफर)

आयफोन १४ सीरीजचे सर्व मोबाईल फोन नवीनतम चिपसेटसह लाँच केले जाऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात प्रगत आणि जलद प्रक्रिया करणारा चिपसेट आहे. दुसरीकडे, आयफोन १४ सिरीजमध्ये ४८ मेगापिक्सलपर्यंतचा प्राथमिक रियर कॅमेरा सेंसर दिसू शकतो. लीकनुसार, सीरिजच्या सर्व मॉडेल्समध्ये नवीन ऑटो फोकस सेल्फी कॅमेरा दिला जाईल असं समजण्यात आलंय.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 14 launch date announced apple live streming time specification price in india gps
First published on: 25-08-2022 at 15:41 IST