Premium

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? २०० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह ‘हे’ आहेत बेस्ट फोन्स, जाणून घ्या

सध्या भारतात अनेक कंपन्यांनी आपले नवनवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

5 new flagship smartphones
आयफोन १५ प्रो मॅक्स हे आयफोन १५ सिरीजमधील टॉप मॉडेल आहे. (Image Credit-Indian Express)

सध्या भारतात अनेक कंपन्यांनी आपले नवनवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. तसेच आगामी काही महिन्यांमध्ये आणखी आहे. नुकतीच जगभरात आयफोन १५ सिरीज लॉन्च झाली आहे. प्रत्येक जण त्याला असलेल्या आवश्यकतेनुसार फोन खरेदी करत असतो. कॅमेरा, बॅटरी , स्टोरेज यानुसार कोणत्या कंपनीचा फोन खरेदी करायचा हे आपण ठरवत असतो. Apple सारखे ब्रँड जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात प्रीमियम स्मार्टफोन्सची बाजारपेठ वाढवतील असा तज्ञांचा विश्वास आहे. आज आपण असेच काही पाच स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर नक्कीच या पाच फोन्सचा विचार तुम्ही केला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफोन १५ प्रो मॅक्स

आयफोन १५ प्रो मॅक्स ही Apple कंपनीचे नवीन टॉप मॉडेल आहे. हे असे एकमेव मॉडेल आहे ज्यात कंपनीने ५X ऑप्टिकल झूम ऑफर करते. याशिवाय आयफोन १५ प्रो मॅक्स या नवीन मॉडेलमध्ये A17 Pro चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. या मॉडेलची विक्री २२ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. जर का तुम्ही एखादा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन शोधत असाल तर आयफोन १५ प्रो मॅक्स हे हाय एन्ड मॉडेल तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. आयफोन १५ प्रो मॅक्स या मॉडेलची किंमत १,५९ ,९०० रुपयांपासून सुरु होते.

हेही वाचा : घाई करा! ‘या’ प्लॅटफॉर्मवर iPhone 14 केवळ ३४,३९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

सॅमसंग Galaxy S23 अल्ट्रा

सॅमसंग Galaxy S23 अल्ट्रा हा कंपनीचा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन या वर्षातीळ प्रमुख स्मार्टफोन्सपैकी एक फोन आहे. सॅमसंग कंपनीने फेब्रुवारी महिन्यात आपला Galaxy S23 Ultra लॉन्च केला आहे. यामध्ये ६.८ इंचाचा एज QHD+ डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगच्या Galaxy S23 Ultra मध्ये एक क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी वाइड कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, १० मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर देखील मिळतो. तर दुरीकडे आयफोन १५ प्रो मॅक्स मध्ये एक क्वाड कॅमेरा सेटअप वापरकर्त्यांना मिळणार आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलच्छ वाइड अँगल कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा 3x टेलीफोटो कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा मिळतो. तसेच यात सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ कॅमेरा मिळतो. सॅमसंग Galaxy S23 Ultra च्या १२ जीबीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १,२४,९०० रुपये आहे. तर ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,३४,९०० रुपये आणि १ टीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,५४,९९९ रुपये आहे .

OnePlus 11

आयफोन १५ प्रो मॅक्स किंवा गॅलॅक्सी झेड फोल्ड ५ प्रमाणेच वल्प्ल्स ११ हा एक परवडणारा स्मार्टफोन आहे. ज्यात स्नॅपड्रॅगन ८ Gen 2 चा सपोर्ट देण्यात आला आहे. वल्प्ल्स ११ ची किंमत ५६,९९९ रुपयांपासून सुरु होते. वनप्लस ११ मध्ये IP रेटिंग आणि वायरलेस चार्जिंगसारखे फीचरचा समावेश नाही आहे. ज्यांना एखादा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

हेही वाचा : Vodafone Idea चे ‘हे’ आहेत सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स; कोणकोणते फायदे मिळणार? जाणून घ्या

विवो X90 Pro

विवो X90 Pro ची सुरुवातीची किंमत ८४,९९९ रुपयांपासून सुरु होते. vivo x90 pro या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्शन ९२०० या चिपसेटसह काम करेल. या फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास vivo x90 मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० MP चा सोनीचा IMX866 मेन सेन्सर आणि १२ MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि १२ MP चा टेलिफोटो लेन्स मिळणार आहे. Vivo X90 Pro मध्ये ४८७० mAh ची बॅटरी मिळते. यामध्ये तुम्हाला १२० W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच टॉप एन्ड व्हेरिएंट हे ५०W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iphone 15 pro max one plus 11 vivo x90 pro and samsung galaxy s23 ultra tmb 01

First published on: 26-09-2023 at 18:13 IST
Next Story
घाई करा! ‘या’ प्लॅटफॉर्मवर iPhone 14 केवळ ३४,३९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?