आयफोन चाहत्यांची गेल्या काही दिवसांपासून असलेली प्रतीक्षा संपली असून कंपनीने ठरल्याप्रमाणे आयफोन 15 सीरिज लाँच केली आहे. जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अॅप्पलने १३ सप्टेंबर रोजी iPhone 15 सीरिज लाँच केली. त्यात चार मॉडेल्सचा समावेश आहे. दरम्यान आयफोन 15 हा बाजारात खरेदीसाठी स्टोअरमध्ये उपलब्ध झाला आहे. यावेळी नवीन मालिका यूएसबी टाइप-सी चार्जिंगसह अनेक बदलांसह आली आहे. कंपनीने iPhone 15 सीरीजमध्ये Android चार्जिंग पोर्ट प्रदान केले आहे. लाइटनिंग पोर्ट ऐवजी यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळाल्यानंतर अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की ते नवीन आयफोन अँड्रॉईड फोनच्या चार्जरने चार्ज करू शकतात की नाही? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…
Android चार्जरने iPhone 15 मालिका चार्ज करू शकता का?
तुम्ही Android चार्जरसह iPhone 15 मालिका देखील चार्ज करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की, तुमचे अॅडॉप्टर किंवा केबल कितीही वॅटेज असले तरीही तुम्ही फक्त २० वॅट्स किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेने iPhone 15 आणि 15 Plus चार्ज करू शकता.
अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या रिपोर्टनुसार, तुम्ही आयफोन १५ आणि १५ प्लस फक्त २० वॅट्स किंवा त्याहून कमी वेगाने चार्ज करू शकाल. ६५ वॅटच्या चार्जरने ते फार लवकर चार्ज होते असे नाही. त्याचप्रमाणे, तुम्ही २७ ते २९ वॅट्सच्या वेगाने iPhone 15 Pro आणि Pro Max चार्ज करू शकाल. प्रो मॉडेल्स बेस मॉडेलपेक्षा किंचित वेगाने चार्ज होतील.
(हे ही वाचा : पहिल्यांदाच ‘इतक्या’ स्वस्तात मिळताहेत Apple iPhones, खरेदीसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा!)
तुम्ही स्मार्टफोनसाठी दिलेल्या चार्जरनेच चार्ज करा. कारण, यामुळे तुमची बॅटरी चांगली राहू शकते. Apple च्या अधिकृत वेबसाइटनुसार, iPhone 15 आणि 15 Plus 20-वॉट अॅडॉप्टरने ३० मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज केले जाऊ शकतात. स्मार्टफोन फास्ट चार्ज करण्यासाठी तुम्ही कंपनीकडून हाय वॉट अॅडॉप्टर देखील खरेदी करू शकता. Apple ने अधिकृतपणे iPhone 15 मालिकेत किती mAh बॅटरी उपलब्ध आहेत याची माहिती शेअर केलेली नाही. तथापि, कंपनीने सांगितले की, नवीन मालिका एका चार्जवर किती काळ टिकेल. Apple च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या विषयाशी संबंधित माहिती पाहू शकता.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 15 series is available for purchase in the marketcan you charge iphone 15 series with android charger pdb