१२ सप्टेंबर रोजी Apple ने आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. १८ तारखेपासून आयफोन १५ चे प्री-बुकिंग सुरु झाले होते. तर आजपासून भारतात आयफोन १५ सिरीजची विक्री सुरु झाली आहे. ज्या इच्छुक खरेदीदारांनी फ्लॅगशिप आयफोनचे प्री बुकिंग केले आहे ते फोनची खरेदी करू शकणार आहेत. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५,आयफोन १५प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन १५ सिरीजमध्ये कंपनीने अनेक नवीन अपग्रेडस दिले आहेत. तथापि, आयफोन १५ मध्ये नवीन ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप, यूएसबी-सी पोर्ट, नवीन चिपसेट आणि अन्य काही नवीन अपग्रेडस देण्यात आले आहेत. मात्र याची किंमत आयफोन १४ प्रमाणेच आहे जो मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता. आयफोन १५ च्या १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ७९,९०० रुपये आहे. तथापि, खरेदीदार पहिल्या दिवशी देखील १४ हजारांची सूट मिळवू शकतात. आयफोन १५ प्लसच्या २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ८९,९०० आणि १,०९,९०० रुपये इतकी आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे. हेही वाचा : ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला MoTo चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, किंमत आणि ऑफर्स एकदा पाहाच भारतात Apple रिसेलर्स आयफोन १५ चे प्री-बुकिंग केलेल्या खरेदीदारांना ९ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. जर का जुन्या स्मार्टफोनची किंमत २० हजारांपेक्षा जास्त असेल तर हा बोनस त्यांच्या किंमतीच्या अतिरिक्त असणार आहे. जर का स्मार्टफोनची किंमत १५ हजारांपेक्षा जास्त असेल तर स्टोअर तुम्हाला ६ हजारांचा एक्सचेंज बोनस देत आहे. याशिवाय खरेदीदार HDFC बॅंकचे कार्ड वापरून आयफोन १५, आयफोन १५ प्लस खरेदी करत असतील तर त्यांना ५ हजारांचा झटपट कॅशबॅक देखील मिळणार आहे. HDFC बँक ऑफर Apple स्टोअर आणि रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स आणि अन्य मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्स मिळणाऱ्या ठिकाणी उपलब्ध आहे. आयफोन १५ सिरीज आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. यंदा कंपनीने या मॉडेल्समध्ये अनेक नवीन अपग्रेडस दिले आहेत. यामधील कॅमेरा हे सर्वात मोठे अपडेट कंपनीने दिले आहे. आयफोन १५ मध्ये आयफोन १४ प्रो प्रमाणे ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळतो. ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याला १२ मेगापिक्सलच्या दुसऱ्या सेन्सरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच आयफोन प्रो मॉडेल्समध्ये अॅक्शन बटण देण्यात आले आहे. A १७ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे.