iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max : ॲपलचा “इट्स ग्लोटाइम” इव्हेंट काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९ सप्टेंबर २०२४ रोजी या इव्हेंटमध्ये आयफोन १५ प्रमाणे चार व्हेरिएंट सादर केले जातील. तर या इव्हेंटमध्ये आयफोन १६ प्रो मॅक्स हा Apple कडून या वर्षीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ठरणार आहे. आयफोन १६ प्रो मॅक्सच्या संदर्भात लीक झालेले फीचर्स पाहता तो आयफोन १५ प्रो मॅक्ससारखाच असू शकतो ; असे सांगितले जात आहे. पण, बारकाईने निरीक्षण केल्यास iPhone 16 Pro Max मधील काही नवीन फीचर्स, अपडेट युजर्ससाठी वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

तुम्ही आयफोन १६ साठी खर्च करावा की नाही, यासाठी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी पुढील चार पॉईंट्स नक्की वाचा…

सगळ्यात मोठ्या स्क्रीनसह येणार आयफोन १६ :

ॲपलने बनवलेल्या आत्तापर्यंतच्या iPhones पैकी आयफोन १५ प्रो मॅक्समध्ये सगळ्यात मोठी ६.७ इंच स्क्रीन आहे. पण, iPhone 16 Pro Maxआणखी एक पाऊल पुढे गेला आहे; ज्यामध्ये बेझल्ससह ६.९ इंच स्क्रीन असेल, जो गेमर व डिजिटल कंटेन्ट क्रिएटरना उपयोगी पडेल. फक्त मोठी स्क्रीन नाही तर फास्ट चार्जिंगसाठी सर्वात मोठी दीर्घकाळ चालणारी बॅटरी आयफोन १६ मध्ये असणार आहे.

शाइन फिनिशसह नवीन रंगाचे पर्याय :

आयफोन १५ प्रो सीरिजवर टायटॅनियम फ्रेमचा मॅट फिनिश आहे, तर ॲपल आयफोन १६ प्रो मॅक्सवर टायटॅनियम बिल्ड फिनिश परत आणण्यावर काम सुरु आहे. Majin Bu च्या मते, आयफोन १६ प्रो मॅक्स नवीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये ‘डेजर्ट टायटॅनियम शेड’चा समावेश आहे.

हेही वाचा…Apple Event 2024: ॲपल इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच, कोणते नाही? जाणून घेण्यासाठी वाचा ‘ही’ सविस्तर यादी

नवीन कॅमेरा हार्डवेअर :

Apple ने आयफोन १६ प्रो मॅक्सच्या कॅमेराचे डिझाईन सारखंच ठेवलं आहे. फक्त फोटो कॅप्चर करण्यासाठी युजर्सना ४८ एमपी अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा दिला आहे. तसेच आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये नवीन कॅप्चर बटण दिलं जाणार आहे; ज्यामुळे आयफोन १५ प्रो मॅक्सपेक्षा आयफोन १६ प्रो मॅक्सचा कॅमेरा थोडा अपग्रेड असणार आहे.

नवीन चिप व नवीन एआय फीचर्स :

आयफोन १५ प्रो मॅक्सवर असणारे सर्व ॲपल इंटेलिजेंस फीचर्स आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये येतील. लाँचदरम्यान ॲपल नवीन एआय फीचर्स सादर करेल, जे आयफोन १६ प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) साठी खास असणार आहेत. नवीन A18 Pro चिप, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणार आहे. नवीन A18 प्रो चिपचा उपयोग, आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये AAA गेमिंग व मल्टीटास्किंग करण्यासाठी अधिक सोईचा ठरेल.

तर ॲपल ‘इट्स ग्लोटाइम’ नावाच्या ९ सप्टेंबरच्या कार्यक्रमात आयफोन १६ आणि इतर उत्पादनांचे अनावरण करेल. हा कार्यक्रम स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे. हा इव्हेंट पॅसिफिक वेळेनुसार सकाळी १० किंवा १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल.