iphone mini 13 under rupees 40000 on flipkart know this diwali deal discount offer on apple smartphone | Loksatta

आता iPhone 13 Mini खरेदी करा फक्त अर्ध्या किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची ‘दिवाळी धमाका ऑफर’

iPhone 13 Mini मिळतोय ४०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत.. जाणून घ्या फ्लिपकार्टची ‘दिवाळी धमाका ऑफर’

आता iPhone 13 Mini खरेदी करा फक्त अर्ध्या किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची ‘दिवाळी धमाका ऑफर’
फोटो(प्रातिनिधिक)

सणासुदीच्या निमित्ताने फ्लिपकार्टवर सध्या बिग दिवाळी सेलचे आयोजन केले जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक उपकरण जसे की स्मार्टफोन, लॅपटॉप, अॅक्सेसरीज आणि इतर आवश्यक घरगुती वस्तू सवलतीत मिळू शकतात. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये Apple iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याचीही संधी आहे . फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये उपलब्ध Apple iPhone 13 डीलबद्दल जाणून घ्या…

Apple iPhone 13 ऑफर किंमत

सेल दरम्यान, Apple iPhone 13 Mini फ्लिपकार्टवरून ३८,०९० रुपयांना खरेदी करता येईल. iPhone 13 Mini चा १२८ जीबी व्हेरिएंट लाँचच्या वेळी ६४,९०० रुपयांना उपलब्ध करण्यात आला होता. १५ टक्के सूट दिल्यानंतर, हँडसेट ५४,९९० रुपयांना खरेदी करता येईल. परंतु तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफरसह फोन अधिक स्वस्तात मिळवू शकता.

( हे ही वाचा: Amazon Extra Happiness Days झाला सुरू; आयफोन सह इतर स्मार्टफोन मिळतायत अर्ध्या किंमतीत)

iPhone 13 Mini वर १६,९०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. त्यांच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात, ग्राहक हा लहान स्क्रीन आयफोन १६,९००रुपयांपर्यंतच्या सूटसह घेऊ शकतात. जर ग्राहकांनी जुने डिव्हाइस १६,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज केले तर iPhone 13 mini ची किंमत ३८,०९० रुपयांपर्यंत खाली येईल. मात्र, एक्सचेंज ऑफर तुमच्याकडे कोणत्या कंपनीचा फोन आहे आणि स्मार्टफोन कोणत्या स्थितीत आहे यावर अवलंबून असते. वर नमूद केलेल्या सर्व ऑफर २५६जीबी आणि ५१२जीबी स्टोरेज वेरिएंटवर देखील लागू होतील.

बँक ऑफरबद्दल बोलायचे तर, कोटक बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहाराद्वारे फोन खरेदी केल्यास १७५० रुपयांपर्यंत आणि क्रेडिट कार्डद्वारे फोन घेतल्यावर १२५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. दुसरीकडे, SBI क्रेडिट कार्ड धारकांना १२५० रुपयांची सूट मिळेल. iPhone 13 Mini स्मार्टफोन 128 GB, 256 GB आणि 512 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. तो हिरवा, निळा, स्टारलाईट, प्रॉडक्ट रेड, मिडनाईट, पिंक, अल्पाइन ग्रीन आणि रेड या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 5.4 इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे.

( हे ही वाचा: खुशखबर! आजपासून भारतात iPhone 14 Plus ची विक्री सुरू; किंमत आणि सर्व तपशील जाणून घ्या)

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर iPhone 13 Mini मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सल प्राइमरी आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड सेन्सर आहेत. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 12-मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-10-2022 at 21:47 IST
Next Story
ट्वीटमधील टॅगवर नियंत्रण ठेवता येणार; काय आहे हे नवे फीचर जाणून घ्या