scorecardresearch

IPL 2022: Disney+ Hotstar विनामूल्य कसं पाहता येईल? मोबाईलवर मॅच बघण्यासाठी रिचार्ज करा ‘हे’ प्लान

आयपीएल २०२२ स्पर्धा २६ मार्चपासून २९ मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील उत्कंठा वाढवणारे सामने पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहे. चालता फिरता मॅच बघता यावी यासाठी चांगल्या प्लानच्या शोधात आहेत.

Disney-620x400
IPL 2022: Disney+ Hotstar विनामूल्य कसं पाहता येईल? मोबाईलवर मॅच बघण्यासाठी रिचार्ज करा 'हे' प्लान

क्रिकेट म्हटलं की भारतीयांचा जीव की प्राण. गल्ली, रस्ते, मैदानात क्रिकेट खेळताना तुम्ही अनेकांना पाहिले असतील. तुम्ही स्वत:ही क्रिकेट खेळला असाल. त्यामुळे भारतीयांसाठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे सण असतो. लवकरच भारतात आयपीएल २०२२ स्पर्धा सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामात १० संघ स्पर्धेत असणार आहेत. आयपीएल २०२२ स्पर्धा २६ मार्चपासून २९ मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील उत्कंठा वाढवणारे सामने पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहे. चालता फिरता मॅच बघता यावी यासाठी चांगल्या प्लानच्या शोधात आहेत. आयपीएल २०२२ लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टारवर केले जाणार आहे. याचा अर्थ असा, तुम्ही डिस्ने + हॉटस्टारद्वारे तुमच्या फोनवर कधीही, कुठेही सामन्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी, तुम्ही डिस्ने + हॉटस्टार मोफत सबस्क्रिप्शन देणार्‍या योजना घेऊ शकता. Jio, Airtel आणि Vi च्या अशा योजनांची माहिती देणार ​​आहोत, जिथे डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन आणि अनेक फायदे मिळतील.

Airtel: एअरटेल युजर्स डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी ५९९ चा रिचार्ज प्लान घेऊ शकता. याची वैधता २८ दिवस आहे आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. त्याचबरोबर ८३८ रुपये डिस्ने + हॉटस्टारच्या विनामूल्य प्लानदेखील आहे. या प्लानची ​​वैधता ५६ दिवसांची आहे.

Jio: जर तुम्ही जिओ युजर्स असाल तर तुमच्यासाठी अनेक प्लान्स आहे. यात डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. तुम्ही जिओचा ६०१ रुपयांचा प्लान खरेदी करू शकता ज्याची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटाही दिला जात आहे. याशिवाय ६ जीबी अतिरिक्त डेटाही मिळेल आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

Women’s World Cup: बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारतासमोर उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी कोणता अडसर? जाणून घ्या

Vodafone Idea: व्होडाफोन आयडियाबद्दल सांगायचे तर, कंपनी ६०१ रुपयांच्या प्लानसह यूजर्सना मोफत डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देत आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि १० एसएमएस देखील दिले जात आहेत. कंपनीचा दुसरा प्लान ९०१ रुपयांचा आहे आणि त्याची वैधता ७० दिवसांची आहे. डिस्ने + हॉटस्टार फ्री सब्सक्रिप्शन, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील या प्लानमध्ये मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 how to free watch disney hotstar know mobile network plan rmt

ताज्या बातम्या