काही दिवसांपूर्वी सुरू झालेले IPL २०२३ आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. उद्या म्हणजेच २८ एप्रिल (रविवारी) आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांचे ५०० रुपयांच्या आतमध्ये १५ चांगले ५ जी प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आहेत. उद्या होणाऱ्या आयपीएल फायनल पाहण्यासाठी तुम्ही कोणताही एक रिचार्ज प्लॅन खरेदी इच्छित असाल तर खालील रिचार्ज प्लॅन्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

आयपीएल २०२३ मधील दुसरा क्वालिफायर सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे मुंबई व गुजरात यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा ६२ धावांनी पराभव केला. या विजयानंतर गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. द्या म्हणजेच २८ एप्रिल (रविवारी) आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण रिलायन्स जिओचे रीचार्ज प्लॅन जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त gadgets now (the times of india) ने दिले आहे.

Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
IPL 2024 Match Ticket Price Updates in Marathi
IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 

हेही वाचा : VIDEO: टेस्लाच्या आगमनाची शक्यता असतानाच Ola ने आपल्या ‘या’ प्रोजेक्टवर सुरू केले काम; सीईओ म्हणाले, “हा भारतातातील…”

रिलायन्स जिओचा २३९ रुपयांचा प्लॅन – जिओचा २३९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंग तसेच १.५ जीबी डेली डेटा आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.

रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्लॅन – रिलायन्स जिओच्या २४० रुपयांच्या प्लॅनमध्ये २३ दिवसांची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंग तसेच १.५ जीबी डेटा ५जी आणि ४जी डेटा आणि १०० एसएमएस करता येतात.

रिलायन्स जिओचा २५९ रुपयांचा प्लॅन – रिलायन्स जिओच्या या २५९ रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५ जी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस तसेच दररोज १.५ जीबी ४जी डेटा मिळतो.

रिलायन्स जिओचा २९९ रुपयांचा प्लॅन – रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि ५जी डेटा आणि दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो.

रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांचा प्लॅन – जिओच्या ३४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता मिळते. तसेच इतर फायद्यांबाबत बोलायचे झाल्यास अनलिमिटेड कॉलिंग आणि ५ जी डेटा आणि दररोज १०० एसएमएस करायला मिळतात. तसेच डेली २.५ जीबी ४ जी डेटा वापरायला मिळतो.

रिलायन्स जिओचा ४१९ रुपयांचा प्लॅन – रिलायन्स जिओच्या ४१९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड ५जी डेटा , दररोज १०० एसएमएस आणि दररोज ३ जीबी ४जी डेटा २८ दिवसांच्या वैधतेसाठी वापरायला मिळतो.

हेही वाचा : खुशखबर! भारतात लॉन्च झाले ChatGPT App; मात्र सध्या ‘या’ युजर्सनाच करता येणार वापर, जाणून घ्या

एअरटेलचा २३९ रुपयांचा प्लॅन – रिलायन्स जिओच्या प्लॅन प्रमाणेच हा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. जो अनलिमिटेड ५ जी डेटासह येतो. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, २०० जीबी डेटा रोलओव्हर , दररोज १ जीबी ४जी डेटा , दररोज १०० एसएमएस आणि २४ दिवसांची वैधता मिळते.

एअरटेलचा २६५ रुपयांचा प्लॅन – एअरटेलचा या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमीटेड ५जी डेटा येतो. याशिवाय वापरकर्त्यांना २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, १जीबी डेटा प्रतिदिन ४ जी डेटा आणि द्डरोज १०० एसएमएस करता येणार आहेत.

एअरटेलचा २९५ रुपयांचा प्लॅन – एअरटेलच्या २९५ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता मिळते. त्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग , दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड ५जी डेटासह २५ जीबी डेटाचा समावेश आहे.

एअरटेलचा २९९ रुपयांचा प्लॅन – एअरटेलच्या या २९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. दररोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी ४जी डेटा वापरायला मिळते. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते.

एअरटेलचा ३१९ रुपयांचा प्लॅन – एअरटेलच्या ३१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५ जी डेटा आणि कॉलिंगची सुविधा येते. यामध्ये दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटाचा समावेश आहे.

एअरटेलचा ३५९ रुपयांचा प्लॅन – या रिचार्ज प्लॅनमध्ये ५ जी डेटा व्यतिरिक्त, अनलिमिटेड कॉलिंग आणि ५ जी डेटासह दररोज २ जीबी ४जी डेटा आणि दररोज १०० एसएमएस करता येतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ महिन्याची वैधता मिळते.

एअरटेलचा ३९९ रुपयांचा प्लॅन – या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २.५ जीबी डेटा प्रतिदिन, अनलिमिटेड ५ जी डेटा आणि दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश आहे.

एअरटेलचा ४५५ रुपयांचा प्लॅन – या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ५ डेटा वापरायला मिळतो. तसेच दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.

एअरटेलचा ४७९ रुपयांचा प्लॅन – एअरटेलच्या या प्लॅनमध्ये १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड ५ जी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससह या हा प्लॅन ५६ दिवसांच्या वैधतेमध्ये येतो.

एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लॅन – यामध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच दररोज ३ जीबी डेटा , अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करता येतात. तसेच वापरकर्त्यांना डिस्नी +हॉटस्टारचे ३ महिन्यांसाठीचे मोबाईल सब्स्क्रिप्शन मिळते.