scorecardresearch

प्रतीक्षा संपली! अखेर iQoo 11 5G भारतात लाँच होणार; जाणून घ्या फीचर्स

iQoo 11 5G: हा स्मार्टफोन लाँच करण्यापूर्वी कंपनीने त्याची काही फीचर्स सांगितली आहेत.

प्रतीक्षा संपली! अखेर iQoo 11 5G भारतात लाँच होणार; जाणून घ्या फीचर्स
iQoo 11 5G / Image courtesy – Financial Express

iQoo ही मोबाईल कंपनी १० जानेवारी म्हणजेच उद्या आपला iQoo 11 5G भारतात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन लाँच करण्यापूर्वी कंपनीने त्याची काही फीचर्स सांगितली आहेत. ज्यात भारतात लाँच होण्याआधी कंपनीने त्याचा रंग कोणता असेल आणि रॅम, किंमत काय असेल हे सांगितले आहे.

iQoo ११ ५जी च्या बेस मॉडेलची किंमत ५५,००० रुपये ते ६०,००० रुपये इतकी असेल असे कंपनीने स्मार्टफोन लाँच करण्याआधी जाहीर केले आहे. हा स्मार्टफोन Qoo आणि Amazon च्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच हा स्मार्टफोन Legend आणि Alpha कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा : CES 2023: जगातील सर्वात मोठ्या ‘टेक शो’ मध्ये, चक्क ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलणारी कारही झाली लाँच

iQoo ११ ५जी या स्मार्टफोनमध्ये १४४०x३२०० पिक्सल रिझोल्युशन आणि ६.७८ इंचाचा सॅमसंग E6 AMOLED स्क्रीन येतो. याची रॅम ३ जीबी आहे. तसेच यामध्ये ५१२ जीबी पर्यत यूएफएस ४.० इतके स्टोरेज वापरकर्त्यांना मिळते. यामध्ये कॅमेरा हा ५० एमपी सॅमसंग जीएन ५ या सेन्सरसह १३ मेगापिक्सल पोर्टेट सेन्सर आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सरयुक्त येतो. iQoo 11 5 जी या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ५,००० mAh इतकी आहे. तसेच यातील प्रो मॉडेलला २०० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ४,७०० mAh इतकी क्षमता असलेली बॅटरी येते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 13:30 IST

संबंधित बातम्या