iQOO स्मार्टफोन्स Amazon India वर सेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. iQOO फ्लॅगशिप डेज सेल १ जुलैपासून Amazon वर सुरू झालाय आणि ४ जुलैपर्यंत चालेल. या सेलमध्ये iQOO Neo 6, iQOO 9 Series, iQOO Z sereis च्या स्मार्टफोन्सवर सूट दिली जाईल. या चार दिवसांच्या सेलमध्ये IQ चे 5G फोन मोठ्या सवलतीत मिळू शकतात. चला तुम्हाला या ऑफरबद्दल सविस्तर माहिती देत आहोत…

iQOO फ्लॅगशिप डेज ऑफर अंतर्गत ग्राहकांना Amazon वरून iQOO स्मार्टफोन्सवर ९००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय ट्रांजेक्शनवर ४ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.

फ्लॅगशिप IQ 9 5G बद्दल बोलायाचे झाले तर या फोनचा ८ GB RAM आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट ४२,९९० रुपयांना आणि १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंट ४६,९९० रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय ICICI बँक क्रेडिट कार्डवर ४००० रुपयांची झटपट सूट मिळेल.

आणखी वाचा : स्वस्तात मिळतोय Reliance चा 4G स्मार्टफोन Jio Phone Next, जाणून घ्या ऑफर

iQOO 9 SE 5G ची किंमत ३३,९९० रुपयांपासून सुरू होते आणि Amazon कूपनद्वारे १००० ची सूट देखील दिली जाईल. याशिवाय २००० रुपयांच्या झटपट सूटसह ३००० रुपयांची अतिरिक्त सूट आणि ICICI क्रेडिट कार्डद्वारे एक्सचेंज ऑफर देखील असेल. iQOO 9 Pro हँडसेटची किंमत ६४,९९९ रुपये आहे आणि ICICI क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना ४००० रुपयांची त्वरित सूट मिळू शकते.

आणखी वाचा : Airtel चा ९१२ GB डेटाचा प्लॅन माहितेय? १ वर्षाचा रिचार्ज आणि अनलिमिटेड कॉल्स, फ्री हॉटस्टार

iQOO Neo 6 च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे तर १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३३,९९९ रुपये आहे. बँक ऑफरनंतर डिव्हाइसची किंमत २६,९९९ रुपयांपर्यंत खाली येईल. iQOO Z6 Pro 5G चे बेस व्हेरिएंट ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह २३,९९९ रुपयांना सेलमध्ये खरेदी केले जाऊ शकते. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास या फोनवर ३००० रुपयांची झटपट सूट आहे. फोनमध्ये ६.४४ इंच AMOLED डिस्प्ले, ४७०० mAh बॅटरी, ६६ W फ्लॅशचार्ज आणि स्नॅपड्रॅगन ७७८ प्रोसेसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. iQOO Z6 44W ची सुरुवातीची किंमत सेलमध्ये १५,९९९ रूपये आहे. हा फोन ICICI क्रेडिट कार्डने १००० रुपयांच्या झटपट सवलतीत घेता येईल.