iQOO ने आपला नवाकोरा 5G स्मार्टफोन iQOO Z6 Lite 5G भारतात लॉंच केला आहे. नवीन iQoo Z6 Lite 5G हा कंपनीचा नवीन बजेट स्मार्टफोन आहे. Z6 Lite 5G हा कंपनीचा पहिला जागतिक स्मार्टफोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरसह येतो. IQ चा हा स्मार्टफोन या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. फोनमध्ये ५००० mAH बॅटरी, ड्युअल रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. कंपनीने फोनसोबत बॉक्समध्ये चार्जर दिलेला नाही. परवडणाऱ्या IQ Z6 Lite 5G मध्ये काय खास आहे ते जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

iQOO Z6 Lite 5G Price in India
iQoo Z6 Lite 5G चा ४ GB रॅम आणि ६४ GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंट देशात १३,९९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंट १५,४९९९ रुपयांना उपलब्ध असेल. फोनची विक्री १४ सप्टेंबरपासून Amazon India आणि IQ Store वर दुपारी १२.१५ वाजता सुरू होईल. हा फोन स्टेलर ग्रीन आणि मिस्टिक नाईट कलर ऑप्शनमध्ये लॉंच करण्यात आला आहे. ग्राहकांना SBI कार्डद्वारे फोनवर २,५०० रुपयांची सूटही मिळू शकते.

आणखी वाचा : 5G नेटवर्क लॉंच होण्याअगोदरच 5G स्मार्टफोन खरेदी करा, २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे हे टॉप ५ ऑप्शन

iQOO Z6 Lite 5G Specifications
IQ Z6 Lite 5G चे मेन फीचर म्हणजे त्याचा प्रोसेसर. नवीन Z6 Lite 5G मध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 4 Gen 1 5G प्रोसेसर देण्यात आला आहे जो खास बजेट फोनसाठी बनवला आहे. हा चिपसेट 6nm प्रोसेसरवर आधारित आहे. IQ च्या या स्मार्टफोनमध्ये ४ GB आणि ६ GB रॅमसह ६४ GB आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेजचा ऑप्शन आहे. फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम २.० फीचर आहे, ज्याद्वारे रॅम वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, एजी मॅट फिनिश अशी फीचर्स आहेत.

आणखी वाचा : १ वर्ष रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही! Reliance Jio च्या प्लॅनमध्ये ७३० GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल

iQoo Z6 Lite 5G स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.नमूद केल्याप्रमाणे कंपनीने बॉक्समध्ये कोणताही चार्जर दिलेला नाही. पण कॉम्बो ऑफर अंतर्गत तुम्ही गरजेनुसार फोनसह ३९९ रुपयांमध्ये चार्जर खरेदी करू शकता. IQ मधील या हँडसेटमध्ये १२० Hz च्या रीफ्रेश रेटसह ६.५८ इंच फुलएचडी + डिस्प्ले आहे आणि २४० Hz च्या टच सॅम्पलिंग रेट आहे.

डिवाइस मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या IQ फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १८ W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. हा हँडसेट Android 12 OS सह येतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iqoo z6 lite 5g launched in india price 13999 rupees specifications features 50mp main camera prp
First published on: 12-09-2022 at 18:55 IST