scorecardresearch

नेटवर्क असून सुद्धा इंटरनेट होतंय स्लो? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून मिळावा हाय-स्पीड डेटा

आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या वापरून तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट मिळवू शकता.

Get high-speed data by following these simple tips
अनेक वेळा असे घडते की पूर्ण नेटवर्क असूनही फोनमध्ये इंटरनेट येत नाही. (Photo : Pexels)

आजच्या काळात आपल्या सर्वांना इंटरनेटची गरज आहे. घरी वायफाय बसवता येत असले, तरी सहसा प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये मोबाइल डेटा असतो. मात्र अनेक वेळा असे घडते की पूर्ण नेटवर्क असूनही फोनमध्ये इंटरनेट येत नाही. तुमच्यासोबतही असे कधी घडले आहे का? आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या वापरून तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट मिळवू शकता.

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेटवर्क पूर्ण असेल पण तरीही मोबाइल डेटा स्लो असेल किंवा अजिबात काम करत नसेल, तर सर्वप्रथम तुमच्या फोनची कॅशे साफ करा. कॅशे साफ केल्याने तुमच्या फोनची गती वाढते तसेच इंटरनेट देखील वाढते. याचे कारण म्हणजे सतत मोबाईल ब्राउझर वापरल्याने वेबसाइटचा डेटा कॅशेमध्ये सेव्ह होतो आणि त्यामुळे डेटा आणि फोनचा वेग कमी होतो.

छोटे बदल मोठा आर्थिक फायदा; लाइट बील कमी करण्यासाठी ‘या’ खास Tips तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील

आणखी एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड वाढवू शकता किंवा जर डेटा अजिबात चालू नसेल तर तुम्ही तो चालवू शकता. आपल्या सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये ‘एअरप्लेन मोड’ असतो, जो सहसा आपण फ्लाइटमध्ये असतो तेव्हा चालू असतो. पण तुमच्या फोनचे नेट चालू नसल्यासही तुम्ही हा मोड वापरू शकता. सेटिंगमध्ये जाऊन हा मोड चालू करा आणि काही वेळाने तो बंद करा, तुमच्या फोनचे इंटरनेट फुल स्पीडने चालू होईल.

आणखी एक सोपा मार्ग, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनचा नेट स्पीड सुधारू शकता, तो म्हणजे इंटरनेट पर्याय बंद करणे. तुम्ही फोनचा डेटा काही वेळ बंद करून नंतर काही वेळाने पुन्हा सुरु केला तरीही तुमचा मोबाइल डेटा पूर्ण वेगाने चालू लागतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is the internet slow despite full network get high speed data by following these simple tips pvp

ताज्या बातम्या