Verify Mobile Number With Aadhar Card : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. या कागदपत्राशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. तुमच्या मोबाइल नंबरशी आधार कार्ड लिंक करणे महत्त्वाचे आहे. कारण तुमच्या कार्डशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती जसे की OTP (वन-टाइम पासवर्ड) तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवली जाते. बँक खाते उघडणे, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी गोष्टींसाठी आधार कार्ड वापरले जाते. तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक झाला आहे की नाही याबद्दल तुम्हाला अजूनही माहिती नसेल, तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असू शकते. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. अशा पद्धतीन तपासाUIDAI तर्फे दिलेल्या verify my email/ mobile number या पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचा मोबाईल नंतर आधारसोबत जोडलेला आहे की नाही, हे तपासू शकता. हे जाणून घेण्यासठी तुम्हाला कुठेही बाहेर धावपळ करण्याची गरज नाही. अगदी घरी बसून तुम्ही सोप्या पद्धतीने हे जाणून घेऊ शकता. आणखी वाचा : Facebook Security Check: तुमचं फेसबूक अकाउंट दुसरं कोणी तर वापरत नाही ना? दोन मिनिटात असं करा चेक सर्वप्रथम युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.आता होमपेजवर, “माय आधार” ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा.ड्रॉप-डाउन मेनूमधून आधार सेवा पर्यायावर जा आणि verify my email/ mobile number ऑप्शनवर क्लिक करा.आता तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाका. (तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तपासायचा असेल तर तिथेच टाका).आता तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि Send OTP वर क्लिक करावे लागेल. आणखी वाचा : Amazon वर जबरदस्त डील! वर्षाच्या अखेरच्या सेलमध्ये स्वस्तात मोबाईल खेरदी करण्याची संधी जर तुम्ही डायलॉग बॉक्समध्ये दिलेला मोबाईल नंबर बरोबर असेल तर तुम्हाला एक पॉप-अप मेसेज दिसेल की तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डने पडताळला गेला आहे. कृपया लक्षात घ्या की, तुम्ही तुमचा नवीनतम मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डसह ऑनलाइन अपडेट करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन ते बदलून घ्यावे लागेल.