scorecardresearch

Premium

Aditya-L1 : ‘आदित्य’चं सूर्याच्या दिशेने आणखी एक पाऊल, ८ दिवसांत पृथ्वीपासून किती दूर पोहोचलं भारताचं यान?

पीएसएलव्हीच्या मदतीने उड्डाण केल्यानंतर आता काही दिवस आदित्य एल-१ हे अंतराळयान पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करेल.

Aditya l1
आदित्य एल-१ या अवकाशयानाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. (PC : ISRO)

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने २ सप्टेंबर २०२३ रोजी आदित्य एल-१ हे अवकाशयान अंतराळात पाठवलं. गेल्या आठ दिवसांपासून हे यान सूर्याच्या दिशेने प्रवास करत आहे. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आलं आहे. या अभ्यासासाठी अवकाश यानात सात वेगवेगळी उपकरणं (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, भारताच्या या सौरमोहिमेबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. आदित्य एल-१ ने पृथ्वीभोवती तिसऱ्यांदा त्याची कक्षा बदलली आहे. आता हे अवकाशयान पृथ्वीभोवती २९६ किमी X ७१७६७ किमी लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. सुरुवातीला हे यान २४५ किमी X २२४५९ किमी कक्षेतून जात होतं. या ५ सप्टेंबरला ‘आदित्य’ने त्याची कक्षा बदलली. त्यानंतर हे यान गेल्या पाच दिवसांपासून २८२ किमी X ४०२२५ किमी या कक्षेतून पुढे सरसावत होतं. आता या अवकाशयानाने तिसऱ्यांदा कक्षा बदलली आहे.

ISRO Lander Rover
लँडर, रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता मावळली; ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांचे मत
Aditya l1
सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या Aditya-L1 बाबत मोठी अपडेट, ISRO चा दुसऱ्यांदा मोठा पराक्रम, एका महिन्यात ‘इतकं’ अंतर पार
isro, chandrayaan 3, Vikram lander, Pragyan rover, moon
Chandrayaan-3 मोहिमेचा the end? चंद्रावरील सूर्योदयानंतर तीन दिवसानंतरही संपर्क नाही…
September 23 equinox day, Earth experience equal days nights tomorrow, Saturday
उद्या २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान; पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर

लाँचिंगनंतर चार दिवसांनी (५ सप्टेंबर) आदित्य एल-१ ने दुसऱ्यांदा यशस्वीपणे त्याची कक्षा (ऑर्बिट) बदलली. त्यानंतर आज पहाटे २ च्या दरम्यान आदित्य एल-१ ने तिसऱ्यांदा कक्षा बदलली. कक्षा बदलण्याच्या ऑपरेशनदरम्यान बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधून उपग्रहांद्वारे इस्रोच्या या अवकाशयानाचा मागोवा घेण्यात आला. आता १५ सप्टेंबर रोजी हे यान चौथ्यांदा त्याची कक्षा बदलेल.

दरम्यान, आदित्य एल-१ ने कक्षा बदलण्याआधी संपूर्ण यान व्यवस्थित असल्याची माहिती दिली. तसेच पृथ्वी आणि चंद्राबरोबरचा सेल्फी पाठवला आहे. यासह अवकाशयानावरील सर्व कॅमेरे नीट काम करत असल्याचं सांगितलं. यासंबंधीचा एक व्हिडीओ इस्रोने शेअर केला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी २०२४ मध्ये हे अवकाशयान एल-१ बिंदूपर्यंत पोहोचेल.

हे ही वाच >> “उद्धव ठाकरेंच्या जळगावातील सभेनं चार टकल्यांच्या मनात धडकी भरलीय”, संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

भारताच्या सौरमोहिमेच्या आराखड्यानुसार आदित्य एल-१ या अवकाशयानाला पृथ्वीभोवती १६ दिवस फिरायचं आहे. त्यानंतर ते सूर्याच्या दिशेने जाणाऱ्या कक्षेत प्रवेश करेल आणि वेगाने सूर्याकडे झेपावेल. ‘आदित्य’ला अंतराळातील एल-१ या बिंदूपर्यंत प्रवास करायचा आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. दरम्यान, आज तकने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आदित्य एल-१ या अवकाशयानाने आतापर्यंत ७२ हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Isro aditya l1 spacecraft successfully performs 3rd earth bound manoeuvre solar mission asc

First published on: 10-09-2023 at 15:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×