scorecardresearch

वेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता

बनावट वेबसाइट्स तयार करून हे चोरटे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात.

fake website
बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. (Photo : Pexels)

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामध्ये बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अशा बनावट वेबसाइट्स तयार करून हे चोरटे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढतात. अनेक प्रकरणांमध्ये डेटा हॅक होतो आणि काहींमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात.

एकूणच माहितीचा अभाव आणि बनावट वेबसाईट पकडण्याची यंत्रणा नसल्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात लोकही अडकत आहेत, मात्र आता याबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. असे एक साधन तयार करण्यात आलेलं आहे ज्यामुळे तुम्ही वेबसाइटला भेट देण्यापूर्वी संबंधित साइट खरी आहे की खोटी हे तपासू शकता.

मोबाईल चोरीला गेल्यावर बँक डिटेल्स आणि मोबाईल वॉलेटचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

अहवालानुसार, या नवीन टूलचे वैशिष्ट्य म्हणजे ते वापरकर्त्यांना कोणतीही वेबसाइट खरी आहे की घोटाळा आहे हे तपासण्यासाठी संबंधित वेबसाइटचा पत्ता प्रविष्ट करण्याचा पर्याय देते. या प्रक्रियेत, हे टूल वेबसाइटला ट्रस्ट स्कोअर देते. इंटरनेट सेफ्टी ग्रुप ‘गेट सेफ ऑनलाइन’ च्या वेबसाइटवर हे टूल होस्ट केले आहे, जे फसवणूक प्रतिबंध सेवा सिफास (CIFAS) सह कार्य करते.

यामध्ये ४० हून अधिक डेटा स्रोत आणि दुर्भावनापूर्ण वेबसाइट अहवालांवर आधारित अल्गोरिदमद्वारे स्कोअर मोजला जातो. वापरकर्त्यांना फक्त वर नमूद केलेल्या वेबसाइटच्या पत्त्यावर त्यांना ज्या वेबसाइटबद्दल जाणून घ्यायचे आहे ते टाइप करावे लागेल. यानंतर, त्या त्यांच्यासमोर संबंधित वेबसाइट योग्य की अयोग्य याची माहिती मिळेल. हे साधन हे तपासते की ती वेबसाइट फिशिंग किंवा मालवेअरसाठी नोंदवली गेली नाही.

गेट सेफ ऑनलाइनचे सीईओ, टोनी नीट म्हणतात, ‘आम्ही व्यक्ती आणि लहान व्यवसायांसाठी ऑनलाइन सुरक्षा सल्ला देत आहोत. इंटरनेट वापरताना लोकांना सुरक्षित ठेवण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी या साधनावर काम करण्यात आले आहे.

Facebook ची मोठी कामगिरी; मे महिन्यात भारतातील १.७५ कोटींहून अधिक कंटेन्टवर केली कारवाई

त्याचवेळी, सिफासचे सीईओ, माईक हेली म्हणाले की, ‘ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. तुम्ही भेट देत असलेली वेबसाइट विश्वासार्ह आहे की नाही हे त्वरीत तपासण्यात सक्षम झाल्याने तुम्ही ऑनलाइन सुरक्षित राहू शकता आणि बेकायदेशीर वेबसाइट्सच्या सापळ्यात अडकण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.’

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It became easier to identify whether the website was genuine or fake the truth will be known in minutes pvp

ताज्या बातम्या