Premium

VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…

Itel च्या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा फुल एचडी + AMOLED कर्व्ह डिस्प्ले मिळणार आहे.

Itel S23+ launch wiht 5,000 mAh battery
लॉन्च झालेला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड १३ च्या Itel OS 13 वर चालतो. (Image Credit-Zohaib Ahmed/The Indian Express))

Itel हा एक लोकप्रिय इलेट्रॉनिक्स ब्रँड आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी लेटेस्ट स्मार्टफोन्स, टीव्ही आणि अन्य गॅजेट्स लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने मंगळवारी एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Itel कंपनीने आपला Itel S23+ देशामध्ये सादर केला आहे. या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना होल पंच कटआऊटसह AMOLED 3D कर्व्ह डिस्प्ले मिळणार आहे. Itel S23+ मध्ये Unisoc T616 4G SoC चा सपोर्ट मिळणार आहे. ज्यामध्ये ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा बॅटरी व किंमत याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Itel S23+ : फीचर्स

Itel S23+ हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ च्या Itel OS 13 वर चालतो. यामध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा फुल एचडी + AMOLED कर्व्ह डिस्प्ले मिळणार आहे. ज्यामध्ये डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस हा ५०० नीट्स इतका असणार आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये एक होल पंच कटआऊट देण्यात आला आहे. या डिस्प्लेला गोरिला ग्लास ५ चे संरक्षण दिले आहे. Itel S23+ मध्ये Unisoc T616 4G SoC चा सपोर्ट मिळणार आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : घाई करा! ‘या’ प्लॅटफॉर्मवर iPhone 14 केवळ ३४,३९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

Itel S23+ या स्मार्टफोनमध्ये AI चा सपोर्ट असणारा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.6 अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच यामध्ये २५६ जीबी इतके ऑनबोर्ड स्टोरेज दिले गेले आहे. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, ४जी ३.५ मिमीचे ऑडिओ जॅक आणि एक यूएसबी टाइप -सी पोर्टचा समावेश आहे. तसेच यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून त्याला १८ W चे वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Itel S23+ : किंमत आणि उपलब्धता

नुकताच लॉन्च करण्यात आलेल्या Itel S23+ फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. हा फोन तुम्हाला Elemental Blue आणि Lake Cyan या रंगात खरेदी करता येईल. सध्या या हॅण्डसेटच्या उप्लब्धतेबद्दल कोणीतही माहिती समोर आलेली नाही. Itel S23+ स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला काही निवडक जागतिक बाजारांमध्ये १,४८,०० NGN (सुमारे १५,८०० रुपये) या किंमतीत लॉन्च करण्यात आले होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Itel launch s 23 plus smartphone india with 50 mp ai camera curve display check price tmb 01

First published on: 27-09-2023 at 09:33 IST
Next Story
गुगलची पंचविशी! जगप्रसिद्ध सर्च इंजिनचा २५ वा वाढदिवस